पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारांकडून ब्रीद वाक्यांचा वापर करत फ्लेक्सची लावण्यात आले असून प्रचाराची वेळ उलटून गेल्यानंतर सुद्धा उमेदवारांकडून प्रचार अजूनही सुरूच आहे.
शेतकऱ्यांकडून पुन्हा 'चलो दिल्ली'ची हाक देण्यात आली आहे. शेतकरी 6 डिसेंबर रोजी पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहेत.
रायगडमध्ये 267 एसटी बसेसचा निवडणुकीसाठी वापर करण्यात येणार आहे. मतदान यंत्र, कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी बसेसचा वापर केला जाणार आहे.
मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणेही घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.
मतदानाच्या दिवशी मेट्रोच्या सेवा कालावधीत वाढ करण्यात आली आहे. भुयारी मेट्रो पहाटे 4 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत धावणार असून 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' उशिरापर्यंत धावणार आहे.
उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रावरील पोलिंग पार्ट्या आज रवाना होणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 4,631 मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र, साहित्य पोहचवण्यासाठी एसटीच्या बस धावणार आहेत.
उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने काहीच वेळात मतदान यंत्र वाटपाला सुरुवात होणार आहे. पुणे शहरात विधानसभा निहाय केंद्रावरून वाटपाला सुरुवात होणार असून पुणे शहरातील ८ मतदारसंघ निहाय केंद्रावरून वाटप होणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र, साहित्य पोहचवण्यासाठी एसटीच्या बस धावणार आहेत.
पुण्यात दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश, संशयितांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रचाराच्या तोफा थंडावल्याने छुप्या प्रचाराला वेग येणार आहे. छुप्या प्रचारावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
कळमनुरीत डॉ. दिलीप मस्केंवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सभा आटपून परत येताना वाहनावर दगडफेक करण्यात आली असून हल्ल्यामध्ये दिलीप मस्के गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक झाली. प्रचारसभा आटोपून घरी परत येताना अज्ञातांकडून वाहनावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहेत.