हुसैन दलवाईंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध व्यक्त केला जातोय. भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी हुसैन दलवाई यांच्या विरोधात निदर्शने केली आहेत.
नागपूरमध्ये संशयित व्यक्तीकडून १ कोटी ३५ लाख ५९ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.सदरील रक्कम कुठून आणि कोणासाठी नेली जात होती याचा तपास सुरु आहे
हरियाणा शिवसेना राज्यप्रमुख विक्रम सिंह यांना धमकी मिळाली आहे. बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्याचा दावा विक्रम सिंह यांनी केला. युकेमधून व्हॉट्सअप कॉल वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी विक्रम सिंह यांच्यानी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. विक्रम सिंह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यप्रमुख आहेत.
मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सीआयएसएफ नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला असून मोहम्मद नावाच्या व्यक्तीकडून धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे.
वर्ध्यात कारमधून एमडी ड्रग्जची तस्करी करण्यात आली. कारसह 8 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ड्रग्जची तस्करी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून ब्राझील दौऱ्यावर जाणार असून ब्राझील, नायजेरिया आणि गयाना या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या आज 3 ठिकाणी सभा आहेत. इचलकरंजी, पंढरपूर आणि धाराशिवमध्ये या सभा होणार आहेत.
काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या वाहनाचा बुधवारी रात्री अपघात झाला. प्रचार संपवून घरी जाताना हा अपघात झाला असून ट्रकने राऊतांच्या वाहनाला मागून धडक दिली.
जळगावमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे ॲम्बुलन्स जळून खाक झाली असून तब्बल पाचशे मीटर अंतरापर्यंत स्फोटाचे हादरे बसले आहेत.
नागपुरात एका व्यक्तीकडून 1 कोटी 35 लाख जप्त करण्यात आले आहेत. बॅगेतून रक्कम घेऊन जाताना ताब्यात घेण्यात आले आहेत.
कोल्हापूरात आत्तापर्यंत 20 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 24 हजार संशयितांवर पोलिसांची कारवाई केली आहे.
मेळघाट मधील आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. अमरावतीच्या मेळघाट परिसरातील 6 गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
रोहिणी खडसेंसह कार्यकर्त्यांनी बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. रोहिणी खडसे यांच्या प्रचार रॅलीत गोंधळ होऊन कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांचा आज कोकण दौरा आहे. आदित्य ठाकरे यांची दुपारी दापोली येथे तर संध्याकाळी खोपोली आणि खालापूर मध्ये जाहीर सभा होणार आहे.
राहुल गांधी यांची आज नांदेडमध्ये सभा असून नवीन मोंढा मैदानावर दुपारी 3 वाजता ही सभा होणार आहे.
राज ठाकरे पुणे आणि बीड दौऱ्यावर असून राज ठाकरे यांच्या पुण्यात दोन सभा आहेत.
पुढील दोन ते तीन दिवस मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे किमान आणि कमाल तापमानात वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवारांची आज 2 ठिकाणी तोफ धडाडणार आहे. अजित पवार नाशिक आणि शिर्डी दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधान मोदींच्या आज 3 ठिकाणी सभा आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथे या सभा होणार आहेत.