पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पुणे, सोलापूर आणि चंद्रपूर दौरा असणार आहे. पुण्यातील SP कॉलेजच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा होणार असून दौऱ्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या मुंबईत आज तीन सभा होणार आहेत. जोगेश्वरी ईस्ट, बांद्रा पश्चिम आणि माहीममध्ये आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. अमित शाहांची आज मुंबईच्या घाटकोपरमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. अकोला आणि अमरावतीत आज योगी आदित्यनाथ यांच्या सभा आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून चिखली आणि खामगावात सभा घेणार आहेत.
शरद पवारांचा आज नाशिकमध्ये सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यात आज सहा सभा घेणार आहेत.
आज कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 4 ठिकाणी जाहीर सभा होणार असून जळगाव,वाशिम,बुलढाणा,अमरावती जिल्ह्यात या सभा होणार आहेत.
देवेंद्र फडणवीस आज रायगड दौऱ्यावर आहेत. पेण मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा होणार असून रविंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरेंच्या आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात प्रचार सभा आहे. दुपारी 1 वाजता ही सभा होणार आहे.
सांगलीच्या मिरजेत गोडाऊनला भीषण आग. आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालं असून गोडाऊनमधील सामानाचं मोठं नुकसान झालं आहे.
राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ६ नोव्हेंबर रोजीच्या प्रचारात संविधनाबाबत खोटं विधान केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुंबई विमानतळावर 3 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 2 कोटी 27 लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चिखलीची सभा रद्द झाली आहे. आता थेट गोंदिया येथील सभास्थळी राहुल गांधी पोहचणार असून राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं सभा रद्द करण्यात आली आहे.
नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अंतरिम जामीन रद्द करण्याची ईडीने मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातली याचिका दाखल करण्यात आली असून जामीनाचा चुकीचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.