Lokshahi live
Lokshahi live

Latest Marathi News Updates live: अशोक पवारांच्या मुलाला अपहरण करुन मारहाण केल्याचा गंभीर आरोप

कसारा रेल्वे स्थानकाजवळ नंदीग्राम एक्स्प्रेसला आग

कसारा रेल्वे स्थानकाजवळ नंदीग्राम एक्स्प्रेसला आग लागली आहे. आग लागल्याचं लक्षात येताच प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. अथक प्रयत्नानंतर नंदीग्राम एक्सप्रेसची आग आटोक्यात आली आहे.

अशोक पवारांच्या मुलाला अपहरण करुन मारहाण केल्याचा गंभीर आरोप

शिरूर हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे उमेदवार अशोकराव पवार यांच्या मुलाचे अपहरण करण्यात करून त्याला जबरीने विवस्त्र करून व तिथे एका स्त्रीला आणून तिला विवस्त्र करून फोटो काढण्यात आले आसल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडली आहे. तर यामध्ये अशोक पवार यांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. ऋषीराज पवार असे आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे नाव असून शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

गृहिणी महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेवरून जाहीरनाम्यात चढाओढ

गृहिणी महिलांना दरमहा 3500 रुपये देणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलंय. आधी महायुती सरकारकडून दरमहा 1500 रुपये देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली त्यानंतर महाविकास आघाडी कडून महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये देण्यासंदर्भात जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. आता वंचित बहुजन आघाडीकडून महिलांना दरमहा 3500 रुपये देणार असल्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय.

मुख्यमंत्र्यांनी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली: श्रीकांत शिंदे

मुख्यमंत्र्यांनी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असल्याचे वक्तव्य खासदार श्रीकांती शिंदे यांनी केलं आहे. राजेश मोरे दिलेल्या संधीचं सोनं करतील असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. लोकांना प्रत्यक्ष भेटण्यावर भर द्या असा सल्ला श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे. राजेश मोरे महायुतीचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार आहेत.

महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार - थोरात

महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. महायुती आता सत्तेत येणार नसल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे. LOKशाहीच्या मुलाखतीत बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य केलं आहे. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा पुनरुच्चार थोरात यांनी केला आहे.

वैभव नाईक ऑन नारायण राणे धमकी

नारायण राणेंच आता वय झाले आहे. त्यांना अशा धमक्या देण शोभत नाही. उद्धव ठाकरेंना अडवणं सोडाच तुम्ही आता आम्हालाही अडवू शकत नाही. उद्धव ठाकरे येणार आणि ते बोलणार. तुमची हिमंत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवाचं असे आव्हान वैभव नाईक यांनी नारायण राणेंना दिले आहे. उद्धव ठाकरे यांची १३ नोव्हेंबरला मालवणात सभा होणार आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे जर आमच्या विरोधात काही बोलले तर त्यांना परतीच्या रस्त्याने जावू देणार नाही असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे. त्याला वैभव नाईक यांनी उत्तर दिल आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मोदी-शाहांवर घणाघाती टीका...

नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी महाराष्ट्राला एटीएम बनवून ठेवला आहे. महाराष्ट्राला किती लुटलं हे मोदी- शाहांनी सांगावं. मोदी, शहाणी आपली कहाणी सांगावी, दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे चार बोट आहे हे पण लक्षात ठेवा. भाजपला मनुस्मृती आणायची आहे आणि लोकशाही व्यवस्था संपवायची आहे.

गुजरातमधील नवसारी येथे गोदामाला भीषण आग

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील देवसर गावात शनिवारी सकाळी एका गोदामाला रासायनिक गळतीमुळे लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. एक कामगार बेपत्ता आहे. सकाळी सुमारास हा अपघात झाला. ट्रकमधून केमिकलने भरलेले बॅरल कामगार उतरवत असताना हा प्रकार घडला. केमिकलच्या गळतीमुळे आग लागली आणि 6 कामगार जखमी झाले

महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, फडणवीस यांची घोषणा

महायुतीचे नवीन सरकार आल्यावर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात केली. महायुतीचे चंद्रपूर क्षेत्राचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ आज चंद्रपुरात जाहीर सभा घेण्यात आली. यात बोलताना फडणवीस यांनी ही घोषणा केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com