13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत एक्झिट पोलवर बंदी

13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत एक्झिट पोलवर बंदी

शिवडी विधानसभा मतदारसंघावर आज तोडगा निघणार?

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत शिवडी विधानसभा निवडणुकीवर आज तोडगा निघणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी बैठकीसाठी दाखल झाले आहेत. अजय चौधरी शिवडीचे विद्यमान आमदार आहेत तर या जागेसाठी सुधीर साळवी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत एक्झिट पोलवर बंदी

महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एक आठवडा एक्झिट पोलवर महाराष्ट्रात बंदी असणार आहे. 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत एक्झिट पोलवर बंदी असणार आहे.

'सीएम व्हायचं असेल तर लोकांमध्ये उतरावं लागतं' शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्या शीतल म्हात्रें यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या, हे कुठून फॉर्म भरणार आहेत का? की नेहमी सारखा पाठच्याच दारातून येणार, जर लोकांच्या मनातला मुख्यमंत्री व्हायचा असेल तर लोकांमध्ये उतरावं लागतं फेसबुक लाईक करून कोणी मुख्यमंत्री होत नाही अशी टीका त्यांनी केली आहे.

रोहिणी खडसे यांनी भरला उमेदवारी अर्ज, केलं जोरदार शक्तिप्रदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी भव्यशक्ती प्रदर्शन करत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्यासोबत रावेर विधानसभेचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवींद्र भैय्या पाटील हे उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांचा महाराष्ट्रात सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात सभा होणार आहेत. 5 ते 14 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात सभा होणार आहेत.

'शरद पवारांना फोडाफोडीचा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे' खासदार उदयनराजे भोसले यांचा पवारांना टोला

खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील इनकमिंगबाबत मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 'शरद पवारांना फोडाफोडीचा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे' असा टोला त्यांनी लगावला आहे.

पुण्यात मनसेला मोठा धक्का; सरचिटणीस रणजित शिरोळेंचा मनसेला जय महाराष्ट्र

पुण्यात मनसेला मोठा धक्का लागलाय. रणजीत शिरोळे यांनी आज तडकाफडकी मनसेच्या जय महाराष्ट्र केलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com