महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

गोपाळ शेट्टी बोरीवलीतून निवडणूक लढण्यावर ठाम

गोपाळ शेट्टी बोरीवलीतून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. फडणवीसांसोबत सागर बंगल्यावर बैठक झाली बैठकीनंतर शेट्टींनी मतदारसंघात कार्यकर्त्यांची भेट घेतलीये. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे गोपाळ शेट्टी निवडणूक लडवण्यावर ठाम आहेत.

'पक्ष जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढणं गरजेचं'

पक्ष जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढणं गरजेचं असं वक्तव्य सदा सरवणकर यांनी केलंय. तसंच माहीममध्ये 15 वर्षांपासून काम करतोय त्यामुशे यश निश्चित असंही सदा सरवणकर म्हणालेत.

'पक्ष जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढणं गरजेचं' माहीमच्या जागेवरुन सदा सरवणकरांचं वक्तव्य माहीममध्ये 15 वर्षांपासून काम करतोय तसंच माहीममधून निवडणूक लढवणारच,यश निश्चित-सदा सरवणकर

करुणा शर्मा यांचा उमेदवारी अर्ज बाद

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज छाननी सुरू आहे. महायुतीकडून धनंजय मुंडे, महाविकास आघाडी कडून राजेसाहेब देशमुख, तर शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे राजेभाऊ फड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या तिघांचाही अर्ज वैध ठरला आहे. दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघातून करुणा शर्मा यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा अर्ज बाद झाल्याने अवैध ठरविण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची नावे या यादीमध्ये आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासह माजी मुख्यमंत्र्यांची नावे देखील स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. महाराष्ट्रातून नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह मोठ्या नेत्यांच्या नावांचा समावेश या यादीमध्ये आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 'यंदा पंजा' हे गाणे केलं लाँच

विधानसभा प्रचारासाठी भाजपचे मोठे नेते येणार

विधानसभा प्रचारासाठी भाजपचे मोठे नेते येणार आहेत. राज्यात दिग्गज नेत्यांच्या सभांचा धुरळा उडणार असून पंतप्रधान मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार आहेत. भाजपकडून 100हून अधिक सभांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

6 नोव्हेंबरला राहुल गांधींची मुंबईत सभा

काँग्रेस नेते राहुल गांधी विधानसभेच्या प्रचार मैदानात उतरणार आहेत. 6 नोव्हेंबरला राहुल गांधींची मुंबईत सभा होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; अंतरवाली सराटीत उपचार सुरू

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती मिळत असून त्यांच्यावर अंतरवाली सराटीत उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांना काल रात्रीपासून ताप, जनरल इन्फेक्शन आणि थोडा अशक्तपणा जाणवत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

नवी मुंबईच्या खारघरमधून 27 लाखांचं ड्रग्ज जप्त

नवी मुंबईच्या खारघरमधून 27 लाखांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ड्रग्ज तस्करीप्रकरणी 20 नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता

राज्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

नाशिक पूर्व मतदारसंघात डमी उमेदवाराची एन्ट्री

नाशिक पूर्व मतदारसंघात डमी उमेदवाराची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक पूर्वमधून गणेश गीते नावाचे दोन उमेदवार असून डमी उमेदवारामागे आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा आहे.

अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला. मेसेज करणाऱ्या व्यक्तीकडून 2 कोटींची मागणी करण्यात आली.

उदय सामंतांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार

उदय सामंतांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. रत्नागिरीत 5 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. राजन साळवींचा प्रचारासाठी उद्धव ठाकरे रत्नागिरीत येणार आहेत. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

आमदार सुहास कांदेंविरोधात गुन्हा दाखल

आमदार सुहास कांदेंविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवीगाळ, धमकीप्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा हा गुन्हा दाखल केला आहे. विनोद शेलार, शेखर पगारांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

पराग शहा ठरले राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार

पराग शहा राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. पराग शाहांकडे 2 हजार 178 कोटींची संपत्ती असून निवडणूक प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. पराग शहांच्या संपत्तीत साडेचार पट वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.

महविकास आघाडीची मुंबईत महत्त्वाची बैठक

महविकास आघाडीची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. उमेदवारी अर्जाची प्रक्रिया संपताच बैठकीचं आयोजन करण्यात आले असून बैठकीत निवडणूक प्रचाराची रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

उल्हासनगर मध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग,

उल्हासनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. कॅम्प तीन मधील गजानन मार्केट मधील दुकानाला आग लागली असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दुकानातील कपड्यांचे साहित्य जळून खाक झालं आहे.

अंकुश काकडे यांच्याकडे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पदाची जबाबदारी 

अंकुश काकडे यांच्याकडे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असून आत्तापर्यंत शहराध्यक्ष राहिलेले प्रशांत जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने काकडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

झिशान सिद्दीकी,सलमान खान धमकी प्रकरण

झिशान सिद्दीकी,सलमान खान धमकी दिल्याप्रकरणी 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव गुरफान खान असल्याची माहिती मिळत आहे.

दिवाळी बाजारात व्होकल फॉर लोकलचा बोलबाला

दिवाळी बाजारात व्होकल फॉर लोकलचा बोलबाला पाहायला मिळत आहे. देशभरात चीनी वस्तूंच्या विक्रीत मोठी घट झाली असून चीनला 1.25 लाख कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.

शासन आपल्या दारी उपक्रमाला स्कॉच पुरस्कार जाहीर

शासन आपल्या दारी उपक्रमाला स्कॉच पुरस्कार जाहीर करण्यात आला असून 280 प्रकल्पांमधून शासन आपल्या दारीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर 38 लाखांचं सोनं जप्त

साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर 38 लाखांचं सोनं जप्त करण्यात आले आहे. सोने कुठून व कशासाठी आले आहे याचा तपास पथकाकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी तासवडे टोलनाक्यावर सुद्धा सोने सापडले होते.

इस्रायलकडून गाझापट्टीत जोरदार हवाई हल्ले

इस्रायलकडून गाझापट्टीत जोरदार हवाई हल्ले करण्यात आले असून या हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जाहीर

राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

राज्यात विधानसभेसाठी 7 हजार 995 उमेदवारांचे अर्ज दाखल

राज्यात विधानसभेसाठी 7 हजार 995 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शेवटच्या दिवशी तब्बल 4 हजार 956 अर्ज दाखल केले गेलेत

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com