उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार
मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाली आहे. तर विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेणार
उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. थोड्याच वेळात 'सिल्व्हर ओक'वर ही बैठक होणार असून निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहेत. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे या बैठकीला महत्व आहे.
राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलली
राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलली आहे. पुढील सुनावणी बुधवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सुनावणी पुढे ढकलण्याची राष्ट्रवादीने मागणी केली होती. बुधवारपर्यंत माहिती सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 12 सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. 8 नोव्हेंबरपासून प्रचाराला सुरूवात होणार आहे.
मोठी बातमी! राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाची बदली
मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद
मनोज जरांगे पाटील यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद आहे. पत्रकार परिषदेतून मनोज जरांगे पाटील उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
बेस्ट कर्मचारी दिवाळी बोनसपासून वंचित
बेस्ट कर्मचारी दिवाळी बोनसपासून वंचित असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत व बेस्ट मधील इतर सर्व युनियन सर्व महत्वाचे पदाधिकारी बेस्टच्या दिवाळी बोनस विषयी बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यात 4 दिवसात 24 ठिकाणी आगीच्या घटना
पुण्यात 4 दिवसात 24 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे गंभीर हानी टळली आहे.
शरद पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यांवर येत आहेत.
परतूर विधानसभेत मविआत बिघाडी
परतूर विधानसभेत मविआत बिघाडी पाहायला मिळत आहे. सुरेशकुमार जेथलिया निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
मुंबईत चार दिवसात फटाक्यांमुळे 49 जण जखमी
मुंबईत चार दिवसात फटाक्यांमुळे 49 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. फटाक्यांमुळे गोरेगाव, शीव,अंधेरीत आगीच्या घटना घडल्या असून गोरेगावमधील आगीत 2 जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
विदर्भात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
विदर्भात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरेंची 5 नोव्हेंबरला वणीमध्ये जाहीर सभा होणार असून मनसे उमेदवार राजू उंबरकर यांचा प्रचार करणार आहेत. 5 नोव्हेंबरला 6 वाजता राज ठाकरेंची ही सभा होणार आहे.
ठाण्यात आज राज ठाकरेंची प्रचारसभा
ठाण्यात आज राज ठाकरेंची प्रचारसभा होणार आहे. अविनाश जाधव यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा होणार असून ब्रम्हांड सर्कलमध्ये प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
फटाक्यांमुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावला
फटाक्यांमुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे. हवेचा निर्देशांक 149वर पोहोचला असल्याची माहिती मिळत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज प्रचाराचा नारळ फोडणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. मनसे उमेदवारांसाठी डोंबिवली आणि ठाण्यात प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळणार असून डोंबिवलीत राजू पाटील यांच्यासाठी तर ठाण्यात अविनाश जाधव यांच्यासाठी सभा घेण्यात येणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून 14 जागांवर उमेदवार जाहीर
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून 14 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आली असून राज्यात 15 ते 20 जागा लढवणार आहेत. 25 मतदारसंघांबाबत चर्चा झाल्याची मनोज जरांगे पाटील यांनी माहिती दिली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहेत. पक्ष नेत्यांकडून बंडखोर नेत्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न सुरू असून बंडखोर नेते माघार घेणार का? याकडे लक्ष लागले आहे.