20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशनाची शक्यता दोन्ही सभागृहाचं सत्र 26 नोव्हेंबरला होण्याची शक्यात.
देवेंद्र फडणवीसांची 6 नोव्हेंबरला जतमध्ये सभा होणार आहे. जतमधून देवेंद्र फडणवीस प्राचाराचा शुभारंभ करणार असून 6 नोव्हेंबराल सकाळी 10 वाजता फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं असून गोपीचंद पडळकरांच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात उतरले आहेत.
शिवसेनेतील बंडखोर अरविंद मोरेंनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मोरेंनी कल्याण पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. श्रीकांत शिंदेंनी समजूत काढल्यानंतर अरविंद मोरे आता शिवसेना उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा प्रचार करणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा ठाण्यात होणार आहे. 4 तारीखला संध्याकाळी 5 वाजता ब्रम्हांड सर्कल येथे ही सभा होणार असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची पहिली सभा ठाण्यात होणार आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अनेक ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येत आहे. दिवाळीच्या आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं
देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर जाणार असून पुण्यातील बंडखोर नेत्यांची समजूत काढणार असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे. अनिल कौशिक यांच्यासह 40 पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस प्रवेश केला आहे.
बोनस न मिळाल्याने बेस्ट कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या भाऊबीजेच्या दिवशी डेपोतून बस सोडणार नसल्याची माहिती मिळत आहे.
गोपाळ शेट्टी सागर बंगल्यावर दाखल झाले असून गोपाळ शेट्टींसोबत फडणवीस चर्चा करणार आहेत. चर्चेनंतर गोपाळ शेट्टींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती आता स्थिर असून पुढील 24 तास त्यांना अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
मंत्री दादा भुसे यांनी शिवसैनिकांसोबत दिवाळी साजरी केली आहे. कार्यकर्त्यांसोबत त्यांनी फराळाचा आनंद घेतला असून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यात येणार असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला आहे.
माजी आमदार रमेश कदम यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. अंतरवाली सराटी येथे जाऊन माजी आमदार रमेश कदम यांनी ही भेट घेतली असून मोहोळ विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पलूस तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल. जोरदार पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झालं आहे. ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे बुरशीजन्य रोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मनसेने दीपोत्सवात लावलेले कंदील अखेर पालिकेने खाली उतरवले आहेत. निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर मनसेतर्फे लावण्यात आलेले कंदील काढण्यात आले आहेत.
भाऊबीजनिमित्त मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला असून भाऊबीजनिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
काटेवाडीत आज अजित पवारांचा पाडवा आहे. काटेवाडीत कार्यकर्ते दाखल व्हायला सुरुवात झाली असून सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. अजित पवारांसोबत सुनेत्रा पवारही उपस्थित आहेत.
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक तुळजापुरात दाखल झाले आहेत.
इंदापूर चे हर्षवर्धन पाटील कुटुंबीय पहिल्यांदाच पाडव्यानिमित्त गोविंद बागेत जाणार आहेत. शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण पाटील कुटुंबीय गोविंद बागेत येणार असून हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मुलगी अंकिता पाटील आणि मुलगा राजवर्धन पाटीलही उपस्थित राहणार आहेत.
बारामती मधील गोविंद बागेसमोर हळूहळू गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात शरद पवार, सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. आठ वाजता शरद पवार कार्यकर्त्यांना भेटणार असल्याची माहिती मिळत असून शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, आमदार रोहित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
पुण्याच्या शिंदे पूल परिसरातील कारखान्याला मोठी आग लागली आहे. फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती मिळत असून अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 नोव्हेंबरला सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. सोलापूर भाजपकडून मोदींच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून सोलापुरातील होम मैदानावर पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार आहे.
पुण्यात काल पाच तासांत 31 आगीच्या घटना घडल्या असून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी नाही.
दिवाळी पाडव्यानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये सजावट करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात.
दिवाळी पाडव्यानिमित्त आज मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
सदा सरवणकर आज राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. माहीममधून मनसेकडून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
बारामतीत आज पवार कुटुंबियांचचे दोन पाडवे पाहायला मिळणार आहेत. बारामती मधील गोविंद बाग या ठिकाणी शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा पाडवा पाहायला मिळणार तर काटेवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पाडवा पाहायला मिळणार आहे.