सुहास कांदे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला
मुंबईत विनापरवाना फटाकेविक्री करणाऱ्यांविरोधात पालिकेची कारवाई मोहीम सुरू
मुंबईत विनापरवाना फटाकेविक्री करणाऱ्यांविरोधात पालिकेकडून कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुंबईतून 229 किलो बेकायदा फटाके जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
खोटे लग्न लावून पैसे घेऊन पळून जाणारी टोळी पोलिसांनी केली जेरबंद
विवाह इच्छुक तरुणांना लग्नाचे आमिष दाखवित खोटा विवाह लावून पैसा घेऊन फरार होणाऱ्या वधूसह तिघांच्या एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या टोळीने राज्यातील अनेक जिल्ह्यांसह गुजरातमधील काही तरुणांना लाखो रुपये घेऊन फसविल्याचा प्रकार समोर आला आहे.या टोळीने आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील तिघांना, गुजरातमधील एकास, सिल्लोडमधील बोरगाव, वैजापूर तालुक्यातील भटाना, नेवासा, मालेगाव, धुळे, जळगाव, पाथर्डी यासह अनेक जिल्ह्यांत खोटे लग्न लावून पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लक्ष्मीपूजन निमित्त जळगाव सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी
दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन, लक्ष्मीपूजनानिमित्त जळगाव सुवर्णनगरीत सोना चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी पाहायला मिळत असून त्यातच आज सोन्याच्या भावात 1 हजारांची तर चांदीच्या भावात 3 हजारांची घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
अकोल्यात बांधकाम विभागाच्या कार्यालयातील रेकॉर्ड रुमला आग
अकोल्यात बांधकाम विभागाच्या कार्यालयातील रेकॉर्ड रुमला आग लागली आहे. आगीत संपूर्ण रेकॉर्ड रुम जळून खाक झाली असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे.
सुहास कांदे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला
सुहास कांदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.
विदर्भात बंडखोरी टाळण्यासाठी नागपुरात बैठकांचं सत्र
विदर्भात बंडखोरी टाळण्यासाठी नागपुरात बैठकांचं सत्र सुरु आहे. फडणवीस-बावनकुळेंच्या उपस्थितीत काल रात्री मॅरेथॉन बैठका झाल्याची माहिती मिळत आहे.
नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; भेसळयुक्त 688 किलो मिठाई जप्त
नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाने मोठी कारवाई केली आहे. दिवाळीच्या दरम्यान विविध कारवाईंमध्ये 688 किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करण्यात आली असून नागपूरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर अधिवेशनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश
नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू करण्याचे आदेश नागपूर विभागीय आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीच्या प्रचाराला 6 नोव्हेंबरपासून होणार सुरुवात
महाविकास आघाडीच्या प्रचाराला 6 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तीन दिग्गज नेते घेणार एकत्रित सभा घेणार असून शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित प्रचार करणार असल्याची माहिती मिळत आहे.
परभणीत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
परभणीत मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. भाजप आमदार मेघना बोर्डीकरांच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल
शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाल्या आहेत.
ऑक्टोबरमध्ये घरांच्या विक्रीत मोठी वाढ
ऑक्टोबरमध्ये घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. घर खरेदीसाठी दसरा, दिवाळीचा मुहूर्त अनेकांनी गाठला. महिनाभरात मुंबईत 13 हजार घरांची विक्री झाल्याची माहिती मिळत आहे.
दिवाळीचं रॉकेट बाल्कनीत पडल्यानं घराला आग
दिवाळीचं रॉकेट बाल्कनीत पडल्यानं घराला आग लागल्याची घटना घडली आहे. बदलापूरच्या खरवई परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. घर बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे.
Mumbai Air Pollution: फटाक्यांच्या आतषबाजीनं मुंबईची हवा खालावली; 'या' परिसरात ‘वाईट’ हवेची नोंद
फटाक्यांवरील निर्बंध, वायुप्रदूषण आणि न्यायालयीन बंधने यामुळे यंदा दिवाळीत वायुप्रदूषण कमी होईल, असा अंदाज होता. मात्र मुंबईकरांनी हा खोटा ठरवला आहे. दिवाळीपूर्वी काहीशी कमी झालेली शहरातील हवा प्रदूषणाची पातळी गुरुवारी फटाक्यांमुळे वाढली. शहरातील शिवडी येथे अति वाईट हवेची नोंद झाली. तसेच इतर भागांतही हवेचा दर्जा वाईट श्रेणीत नोंदला गेला.
मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे
मुंबईत पुढील दोन दिवसही कमाल तापमानाचा पारा चढाच राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.