Latest Marathi News Updates live: प्रियंका गांधी यांच्या रोड शोमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने

Latest Marathi News Updates live: प्रियंका गांधी यांच्या रोड शोमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने

प्रियंका गांधी यांच्या रोड शोमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने

प्रियंका गांधी यांच्या रोड शोमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. नागपूरच्या बळकट चौकात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना हटवण्यात आले आहे.

मणिपुरात पुन्हा हिंसाचार

मणिपुरात पुन्हा हिंसाचार उसळला आहे. इंफाळ पश्चिम आणि इंफाळ पूर्व जिल्ह्यात संचारबंदी जारी करण्यात आली आहे. सात जिल्ह्यात दोन दिवसांसाठी इंटरनेट बंद ठेवण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या बॅगांची पुन्हा तपासणी

उद्धव ठाकरेंच्या बॅगांची पुन्हा तपासणी करण्यात आली आहे. कराड विमानतळावर उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या. मोदी, शाहांची बॅग तपासली का? असा ठाकरेंनी पथकाला सवाल केला आहे.

देव- देवतांचा अपमान केल्यास कारवाई करण्यासाठी कायदा आणणार: प्रकाश आंबेडकर

देव- देवतांचा अपमान केल्यास कारवाई करण्यासाठी कायदा आणणार असल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. फौजदारी कारवाई करण्यासाठी कायद्याची गरज असल्याचं त्यांनी भुसावळ येथील सभेत म्हटलं आहे.

मिरजच्या शिवसैनिकांना उध्दव ठाकरेंचे आवाहन

मिरज येथील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यासाठी उध्दव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. महायुतीत रात्र थोडी ढोंग फार झाली आहेत. ही ढोंग गाढावी लागणार आहेत. मिरजकरांनो नाराज होवू नका मी विजयी सभेला येणार. मिरज पॅटर्न आपण म्हणतो, तसा मशाल पॅटर्न पाहिजे. महायुतीने आपल्या आयुष्यात जो काही अडीच वर्षात अंधार निर्माण केला आहे, तो दूर करण्यासाठी मशाल धगधगली पाहिजे. त्यासाठी आपल्या हक्काचा माणूस तानाजी सातपुते यांना विधानसभेत पाठवा. महागाई सोबत महायुतीच्या थापा वाढत आहेत.

अन्यायग्रस्तांना न्याय देणं हेच आमचे उद्दिष्ट: संभाजीराजे छत्रपती

अन्यायग्रस्तांना न्याय देणं हेच आमचे उद्दिष्ट आहे. एकाच घरात तीस-चाळीस वर्षे सत्ताकेंद्र आहेत. या राजकीय घरणेशाहीविरोधात विरोधात आम्ही लढणार असल्याचे संभाजीराजे छत्रपतींनी वक्तव्य केलं आहे.

चंद्रकांत पाटलांनी लुटला क्रिकेटचा आनंद

भाजपचे दिवंगत नेते विलास मोहोळ यांच्या स्मरणार्थ एनडीए मैदान येथे साईनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने दोस्ती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस उपस्थित राहून आ. चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी भाजप नेते कैलास मोहोळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

माजलगाव मध्ये सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी...

बीडच्या माजलगाव मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनराव जगताप यांच्या प्रचारार्थ माजलगाव मध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल आहे. सभेला शरद पवार येणार होते. मात्र काही कारणास्तव शरद पवारांचा दौरा रद्द झालाय. त्यांच्या ठिकाणी सुप्रिया सुळे माजलगावच्या सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान सुप्रिया सुळे हेलिकॉप्टरने माजलगावला दाखल झाल्या असता यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी केली.

"आम्ही विकासासाठी महायुतीमध्ये गेलो तरी शरद पवारांची साथ सोडली नाही" या विषयाला प्रफुल पटेल यांचं घुमजाव....

मी शरद पवार यांची साथ सोडली नाही. निधी भेटत नव्हती म्हणून मी महायुती सोबत गेली आहे. असे विधान अजित पवार यांनी केलं आहे. यावर उत्तर देताना प्रफुल पटेल म्हणाले आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत. विकासाच्या मुद्यावर आम्ही भाजपा बरोबर गेलं आहे. मोदी साहेबांनी देशाचा विकास केला आहे. घरकुल योजना, लाडली बहिण योजना सुरू केली. अजित दादा बोलले आम्ही विकासासाठी महायुती मध्ये जुळले आहोत. मात्र शरद पवार यांची साथ सोडली नाही या विषयाला प्रफुल पटेल यांचं घुमजाव केलं असल्याने आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका

एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 'लाडक्या बहि‍णींना 1500, खोबऱ्याचे दर 300 रुपयांवर' म्हणत खडसेंनी महागाईवरुन सरकारवर निशाणा साधला आहे.

अनिल देसाईंकडून बाळासाहेबांना अभिवादन

अनिल देसाईंकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलं आहे. अनिल देसाईंनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आज 12वा स्मृतिदिन आहे.

शरद पवारांच्या बॅगांची तपासणी

निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. बारामती हेलिपॅडवर शरद पवारांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. बारामतीहून करमाळ्याकडे रवाना होताना ही तपासणी करण्यात आली आहे. करमाळयात आमदार नारायण पाटील यांच्या प्रचारासाठी ते दाखल झाले आहेत.

'मी शरद पवारांना सोडलेलं नाही' अजित पवारांचं मोठं वक्तव्य

'मी शरद पवारांना सोडलेलं नाही' अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'सगळ्याच आमदारांची इच्छा सरकारमध्ये जाण्याची होती. निधी मिळण्यासाठी अडचण होत असल्यानं निर्णय घेण्यात आल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

एसटीची दुचाकीला धडक 2 जण ठार...

वाशिम कडून हिंगोली कडे जाणाऱ्या भरधाव एसटी बस गाडीने एका दुचाकीला धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारासाठी नेत असतांना मृत्यू झाला असून राजगाव ओव्हर ब्रिज खाली ही घटना घडली असून, ब्रिज खालून जाणाऱ्या दुचाकीला एसटी बसने फरफटत 50 फूट नेले त्यामुळे नागरिकाचा संताप पाहायला मिळाला. नागरिकांनी काही काळ अकोला हैद्राबाद महामार्गावर रास्ता रोको केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com