विशाल पाटील-जयंत पाटलांममध्ये चिन्हावरुन मिश्किल टोलेबाजी रंगलेली पहायला मिळाली. खासदार विशाल पाटलांनी सभेत बोलता बोलता तुतारी ऐवजी घड्याळ म्हटलं. यानंतर आमचं घड्याळ चिन्ह चोरीला गेलंय असं जंयत पाटील म्हणाले आहेत.
भाजपाच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
पुण्यात शनिवारी राज ठाकरेंच्या दोन सभा होणार आहेत. भाजपाच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. गणेश भोकरे, किशोर शिंदेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंच्या सभा.
कॉंग्रेसकडून कलम 370 पुन्हा आणण्याचा प्रयत्न- पंतप्रधान मोदी
काश्मीरमध्ये कॉंग्रेस आघाडीचं सरकार येताच कलम 370 पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत आहे. जगातील कुठलीच ताकद कलाम 370 पुन्हा आणु शकणार नाही अस म्हणत सभेतून मोदींनी हल्लाबोल केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ नवी मुंबईत धडाडणार
नवी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेणू सैद मैदानावर बेलापुरचे मनसे उमेदवार गजानन काळे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडत आहे.संध्याकाळी होणाऱ्या या सभेकडे नवी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.नवी मुंबईतील मागील काही दिवसात बिघडलेले राजकारण आणि आताची स्थिती यावर राज ठाकरे काय भाष्य करतात हे पाहणे महत्त्वाचे असेल,कशी आहे सभेची तयारी,
मुंबईच्या भूलेश्वर परिसरात २ कोटी ३० लाख ८६ हजाराची रोकड भरारी पथकाकडून जप्त
मुंबईच्या भूलेश्वर परिसरात २ कोटी ३० लाख ८६ हजाराची रोकड भरारी पथकाकडून जप्त. ही संशयित रोकड नेहणार्या १२ जणांना भरारी पथकाने ताब्यात घेतलं. या जणांकडे पोलिस आणि भरारी पथक अधिक चौकशी करत आहेत.
बीसीसीआयकडून मोठा निर्णय, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानात जाणार नाही
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही. बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचं म्हटल आहे. भारत पाकिस्तानमध्ये संबंध सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना, पाकिस्तानऐवजी दुबईमध्ये सामने खेळवण्याचा विचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
राजकारण्यांना निवडणूक आयोगाच्या कडक सूचना
राजकारण्यांना निवडणूक आयोगाच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. महिला उमेदवारांविरोधात अशोभनिय वक्तव्य खपवून घेणार नाही. महिलांबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण
मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. मृत रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली.आरोपींना तातडीनं अटक करण्याची म्युनिसिपल मजदूर युनियनची मागणी केलीये.
ईडीकडून 'ज्ञानराधा'ची 333 कोटींची मालमत्ता जप्त
ईडीकडून ज्ञानराधाची 333 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केलीय. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये सुरेश कुटे यांच्या कुटे डेअरी, कुटे सन्स फ्रेश डेअरी या कंपन्यांच्या जमिनींचा समावेश आहे.