मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावात पुन्हा मुख्यमंत्री शिंदे व्हावेत म्हणून ग्रामदैवतेच्या मंदिरात अभिषेक
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव दरे, तांब या गावात गावातल्या ग्रामदैवतेला ग्रामस्थांनी अभिषेक घातला आहे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे आमच्या गावात यावेत आणि राज्याचे आदर्श मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी रुजू व्हावेत असा अभिषेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावातील गावातील ग्रामदैवतेला साकडं घातला आहे.
ईव्हिम मशीनला विरोध करणारी याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली
EVMला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जिंकलं की तुम्हाला EVM चांगले वाटतात निवडणूक हरली की तुम्हाला EVMमध्ये छेडछाड दिसते अस कोर्टाने म्हटलं आहे.
शाळेच्या पिकनिकला जाणाऱ्या बसला अपघात,अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू, दोन गंभीर जखमी
विद्यार्थ्यांना पीकनिकसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल बसला देवळी पेंढरी घाटात झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस ताफ्यासह दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी एम्समध्ये दाखल केले.
नरसय्या आडमांकडून राजकारणातून निवृत्तीची घोषणा
सोलापूर मध्य विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव झाल्यानंतर माजी आमदार नरसय्या आडम यांची निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र आयुष्यभर सामाजिक आणि चळवळीत काम करणार, निवडणुकात पक्षाचा कार्यकर्ता या पुढे सहभागी होईल.
नव्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी आणखी 4 दिवस वाट पाहावी लागणार
नव्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी आणखी 4 दिवस वाट पाहावी लागणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत पक्षांतर्गत प्रक्रीया पूर्ण होईल अशी शक्यता आहे. त्यापूर्वी भाजप आमदारांची बैठक होईल, त्यानंतर आमदारांचं म्हणणं पक्षश्रेष्ठींना कळवलं जाईल.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संविधानाचे पूजन
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संविधानाचे पूजन करण्यात आले आहे. संविधान दिनानिमित्त फडणवीस यांकडून संविधानाचे वाचन देखील करण्यात आले आहे. सागर निवासस्थानी फडणवीसांनी संविधानाच्या प्रतीचे पूजन केले.