Latest Maharashtra News Updates; शाहरुख खानला धमकी देणारा आरोपी फैजान अटकेत

Latest Maharashtra News Updates; शाहरुख खानला धमकी देणारा आरोपी फैजान अटकेत

शिवसेना ठाकरे गटाचा मनसेला धक्का

ठाकरेंच्या शिवसेनेचा मनसेला धक्का बसलाय. मनसे नेते अखिल चित्रे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. थोड्याच वेळात मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. वांद्रे पूर्वमधून तृप्ती सावंतांना तिकीट दिल्यानं चित्रे नाराज होते.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. आतापर्यंत एकूण 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना पुणे, मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.

उत्तर भारतात छट पुजा पर्व सुरु

उत्तर भारतात छट पुजा पर्व सुरु झालं आहे. दिवाळीनंतर होणाऱ्या छटपुजेच्या सणाला उत्तर भारतीय गावाकडे गेले आहेत. हजारो भाविक नदीकाठावर जमा होऊन आज संध्याकाळी सुरु होणारी छटपुजा उद्या सकाळपर्यंत चालते.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी ठाकरे गटाला मोठी खिंडार

आदित्य ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यापूर्वी ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे. दोन माजी नगरसेवकांसह बारा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्या अंतर्गत गटबाट जिला कंटाळून राजीनामे देत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितला. यापुढे आम्ही हिंदुत्वासाठी काम करणार आहेत. नेमका कुणाचं काम करणार हे दोन-तीन दिवसात सांगू असं देखील पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. आंबेडकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

शिरुरमध्ये आमदार अशोक पवारांच्या सभेत गोंधळ

शिरुरमध्ये आमदार अशोक पवारांच्या सभेत गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 'कारखाना का बंद पाडला?' असा सवाल विचारत शेतकऱ्यांनी जाब विचारला आहे. अशोक पवार यांना भ्रष्टाचारी म्हणत शेतकरी आक्रमक झाले.

पुण्यात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा

पुण्यात उद्या एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे. शिवाजीनगर मतदार संघात शिंदे सभा घेणार आहेत. एकनाथ शिंदेंची बाईक रॅली ही होणार असल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी 5 वाजता गोखलेनगर येथील मैदानावर ही सभा होणार आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया आणि पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळ मंत्रालयात जाऊन राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. भाजपाच्या खोट्या जाहिराती विरोधात तक्रार केली आहे.

'संविधान वाचवा' म्हणणं हा राहुल गांधींचा खोटेपणा: चित्रा वाघ

'संविधान वाचवा' म्हणणं हा राहुल गांधींचा खोटेपणा असल्याचे वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे. कोरं संविधान छापणं हा आमच्या महामानवाचा अपमान आहे. जनता त्यांना माफ करणार नसल्याचं म्हणत चित्रा वाघ यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

भाजप महायुतीचे ऑफिशियल गाणं प्रदर्शित

भाजप महायुतीचे ऑफिशियल गाणं प्रदर्शित झालं आहे. विकासाच्या अजेंड्यावर भाजप महायुतीचं गाणं आधारित आहे. अटल सेतू, नदी जोड प्रकल्प, समृद्धी महामार्ग अशा विविध विकासकामांचा गाण्यात दाखला देण्यात आला आहे. लाडकी बहिण योजना, वीजबिल माफी योजनांचा ही गाण्यात उल्लेख आहे. विधानसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर भाजपकडून व्हिडियोंची मालिका प्रदर्शित करण्यात आली आहे.

शिवाजी पार्कवर सभेसाठी मनसे-ठाकरेंची शिवसेना आग्रही

शिवाजी पार्कवर सभेसाठी मनसे-ठाकरेंची सेना आग्रही असल्याचे समोर आलं आहे. '17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदान सभेला मिळावं' यासाठी सभेला परवानगीसाठी BMC आणि निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं आहे. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असल्यामुळे ठाकरे गट या दिवशी शिवाजी पार्कावर सभा घेण्यासाठी आग्रही आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मोदींचा रोड शो

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मोदींचा रोड शो होणार आहे. येत्या 12 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुण्यात रोड शो होणार आहे. 12 नोव्हेंबरला मोदींच्या दोन सभा आणि एक रोड शो होणार आहे. चिमूर आणि सोलापुरात मोदींच्या सभा तर पुण्यात मोदींचा रोड शो होणार आहे.

दिव्यांग-वद्धांना घरुनच बजावता येणार मतदानाचा हक्क

पैठणमध्ये दिव्यांग आणि 85 पेक्षा अधिक वय असणाऱ्या मतदारांना घरीच मतदानाचा हक्क बजवता येणार. निवडणुक निर्णय अधिकारी निलम बाफना यांची माहिती.

राज ठाकरे यांचं सर्व राजकीय पक्षांना आव्हान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पहिली प्रचार सभा पार पडत आहे.

2 दिवसात मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार- राज ठाकरेंची घोषणा

येत्या 2 दिवसात मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी घाटकोपरच्या सभेत केलं आहे.

कॉंग्रेसकडून अखेर बंडखोरांवर कारवाई

कॉंग्रेसकडून अखेर बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील बंडखोरांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. आबा बागुल,कमल व्यवहारे आणि मनिष आनंद यांच्यासह राज्यातील कॉंग्रेसच्या इतर बंडखोरांवरही कारवाई करण्यात आलीय. पक्षाविरोधी भूमिका घेतल्याने कारवाई ही कारवाई करण्यात आलीय.

शाहरुख खानला धमकी देणारा आरोपी फैजान अटकेत

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. फैजान नावाच्या व्यक्तीने शाहरुख खानला धमकी दिली. धमकी देणाऱ्या व्यक्तीचे ठिकाण छत्तीसगडमधील रायपूर होते. वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com