IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

पहिल्या सत्रातील लिलावात विकला गेलेला खेळाडू अर्शदीप सिंग - १८ कोटी (पंजाब किंग्ज ) RTM

कगिसो रबाडा - १०.७५ कोटी( गुजरात टायटन्स)

श्रेयस अय्यर -२६.७५ कोटी (पंजाब किंग्ज)

जोस बटलर -१५.७५ कोटी (गुजरात टायटन्स)

मिचेल स्टार्क - ११.७५ कोटी ( दिल्ली कॅपिटल्स)

पहिल्या सत्रातील सर्वात मोठी बोली रिषभ पंत - २७ कोटी (लखनऊ सुपरजायंट्स)

शमी आता हैदराबादकडून खेळणार, मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबाद संघात स्थान

मोहम्मद शमी हैदराबादकडून खेळणार असून सनरायझर्स हैदराबादने मोहम्मद शमीला 10 कोटीला विकत घेतलं आहे.

लखनौ सुपर जायंट्स संघात ऋषभ पंतचे पदार्पण

ऋषभ पंतसाठी LSG आणि RCB 10 कोटींची लढत सुरु होती. दिल्ली कॅपिटल्स संघाचा माजी कर्णधार ऋषभ पंत याला २७ कोटीला लखनौ सुपर जायंट्स संघाने विकत घेतलं.

मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्सच्या संघात

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी KKR आणि DC मध्ये लढत सुरु होती. मिचेल स्टार्क हा मागील हंगामात सर्वात महागडा खेळाडू होता तर आता 11 कोटी 75 लाखांच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या संघात सामिल करुन घेतल आहे.

गुजरात टायटन्सच्या संघात जोस बटलर सामील

गुजरात टायटन्सने जॉस बटलरला १५ कोटी ७५ लाखांना संघात घेतल आहे. तर पुढे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी KKR आणि DC मध्ये लढत आहे.

श्रेयस अय्यर पंजाब किंग्सच्या ताफ्यात

श्रेयस अय्यरने आयपीएलची आतापर्यंतची सर्वात मोठी बोली मिळाली आहे. पंजाब किंग्सने 26.75 कोटीला श्रेयस अय्यरला विकत घेतल आहे. पुढे जोस बटलर आहे आणि त्याची मूळ किंमत 2 कोटी आहे.

कागिसो रबाडा गुजरात टायटन्सच्या संघात

दुसऱ्या बोलीत दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा याला गुजरात टायटन्सने या गोलंदाजाला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याची किंमत 2 कोटी रुपये होती.

RTM ने 18 कोटींना अर्शदीप सिंग PBKS मध्ये घेतले विकत

भारतीय खेळाडू अर्शदीप सिंगवर पहिली बोली लावली गेली असून अर्शदीप सिंग या खेळाडूसाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत पाहायला मिळत होती पण पंजाब किंग्सने राईट टू मॅच या कार्डचा वापर करून अर्शदीप सिंगला 18 कोटी रुपयांना खरेदी केले.

लिलावाचे वेळापत्रक काय?

पहिले सत्र दुपारी 3:00 ते 5:00

संध्याकाळी 5:00 ते 5:45 लंच ब्रेक

दुसरे सत्र संध्याकाळी 5:45 ते रात्री 10:30

आयपीएलच्या 10 संघांकडे किती रक्कम आहे ?

1) पंजाब किंग्स - पर्स 110.5 कोटी

2) सनरायझर्स हैदराबाद - पर्स 45 कोटी

3) मुंबई इंडियन्स - पर्स 45 कोटी

4) दिल्ली कॅपिटल्स - पर्स 73 कोटी

5) लखनऊ सुपर जायंट्स - पर्स 69 कोटी

6) राजस्थान रॉयल्स - पर्स 41 कोटी

7) गुजरात टायटन्स - पर्स 69 कोटी

8) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - पर्स 83 कोटी

9) चेन्नई सुपर किंग्स - पर्स 65 कोटी

10) कोलकाता नाईट रायडर्स - पर्स 51 कोटी

आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

आयपीएल 2025 च्या लिलावात आज खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. एकूण 577 खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात 82 खेळाडूंनी अव्वल स्तरावर नोंदणी केली जाणार आहे, ज्याची किंमत 2 कोटी आहे. तर 27 खेळाडूंची दुसरी किंमत 1.50 कोटी आहे. त्याचसोबत 18 खेळाडूंची किंमत 1.25 कोटी आहे आणि 23 खेळाडूंची किंमत 1 कोटी अशा राखीव किंमतीसह यादी करण्यात आली असून उरलेल्या खेळाडूंना 30 लाख ते 75 लाखापर्यंत वर्गीकृत केले आहे. यादरम्यान सर्वात महागडा खेळाडू किती पैसे घरी घेऊन जाणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com