Lokshahi Marathi LIVE Blog
Lokshahi Marathi LIVE Blog

Latest Marathi News Updates live: बोरिवलीत अमित शाहांच्या सभेनंतर नाराजीनाट्य

बोरिवलीत अमित शाहांच्या सभेनंतर नाराजीनाट्य

बोरिवलीत अमित शाहांच्या सभेनंतर नाराजीनाट्य पाहायला मिळालं. भाजप कार्यकर्त्याने गोपाळ शेट्टींच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. शेट्टींच्या समर्थकांनी कार्यकर्त्याला पकडलं. काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं.

बारामतीत नातवासाठी आजी प्रचाराच्या मैदानात

बारामतीत नातवासाठी आजी प्रचाराच्या मैदानात उतरली आहे. प्रतिभा पवार या युगेंद्र पवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरल्या असून प्रतिभा पवार बारामतीच्या पश्चिम भागाचा दौरा करणार आहेत.

राहुल गांधी 14 आणि 16 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर

राहुल गांधी 14 आणि 16 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी चार जाहीर सभा घेणार असून 14 नोव्हेंबर रोजी नंदुरबार आणि नांदेड येथे सभा घेणार आहेत. तर १६ नोव्हेंबर रोजी अकोला आणि चिमूर येथे सभा घेणार आहेत.

पंकजा मुंडेंकडून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाबाबत वक्तव्य

राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हा बाबत पंकजा मुंडे कडून पुन्हा एकदा वक्तव्य केलंय. कधी वाटलं नव्हत घड्याळाला मतदान मागण्याची वेळ येईल तसंच सगळीकडे कमळ चिन्ह दिलं असतं तर मी निवडून आणल असत असं मुंडे म्हणाल्या आहेत.

नितीन गडकरींच्या बॅग्सचीही तपासणी

लातूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. लातूर किल्लारी हेलिपॅडवर विभागाच्या पथकाकडून गडकरींच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे.

राज्यात महाअनाडी गठबंधन, योगी आदित्यनाथ यांचा मविआवर हल्लाबोल

राज्यात महाअनाडी गठबंधन आहे असा हल्लाबोल योगी आदित्यनाथ यांनी मविआवर केला आहे. काँग्रेस नेतृत्व मुस्लिम लीग समोर शरण गेले होते अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी मल्लिकार्जुन खरगेंवर केली आहे.

भाजपकडून मराठा समाजाबाबत पुस्तक प्रकाशित

भाजपकडून मराठा समाजाबाबत पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. पुस्तकात मराठा समाजासाठी केलेल्या कामांची माहिती देण्यात आली आहे. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे. पुस्तकात मराठा समाजाबाबतच्या योजनांची माहिती देण्यात आली आहे.

'शरद पवारांनी शिवसेनेचे 18 ते 20 आमदार फोडले' छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

'शरद पवार यांनी शिवसेनेचे 18 ते 20 आमदार फोडले', छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म पवारांनी केलं असल्याचे वक्तव्य भुजबळांनी केलं आहे. शिवसेना सोडण्यासाठी पवारांनी प्रवृत्त केल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे.

विक्रोळीत राज ठाकरे यांच्या सभेत संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची

विक्रोळी विधानसभेत राज ठाकरे यांची दुसरी सभा होत आहे या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना मनसेने कडून निमंत्रण देण्यात आले असून संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची देखील राज ठाकरे यांचे भाषण भाषण ऐकण्याकरिता ठेवण्यात आलेली आहे.

राज ठाकरे यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर यांचे निधन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते राजन शिरोडकर यांचे मंगळवारी निधन झाले. राजन शिरोडकर हे गेल्या काही काळापासून आजारी होते. राजन शिरोडकर हे राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. कोहिनूर मिल प्रकरणात राजन शिरोडकर यांची ईडी चौकशी झाली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांचे ते वडील होते.

उद्धव ठाकरे यांना हवाई उड्डाण करण्यास परवानगी नाही

उद्धव ठाकरे यांना हवाई उड्डाणं करण्यास परवानगी नाही. औसा सभा संपल्यावर उद्धव ठाकरे उमरग्याच्या सभेसाठी हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र पंतप्रधान मोदी सोलापूरला येणार असल्यामुळे हवाई उड्डाण करण्यास परवानगी नाकारली आहे.

उद्धव ठाकरे आणि नार्वेकरांच्या बॅगांची पुन्हा तपासणी

उद्धव ठाकरे आणि नार्वेकरांच्या बॅगांची पुन्हा तपासणी करण्यात आली आहे. सलग दुसऱ्यांदा ठाकरे आणि नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. धाराशिव दौऱ्यावर जात असतांना बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. औसा हेलीपॅडवर ठाकरे आणि नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे.

वरळी कोळीवाड्यात मतदारांना भांडी वाटप

वरळी कोळीवाड्यात मतदारांना भांडी वाटप करण्यात आलं आहे. उमेदवार मिलिंद देवरांच्या कार्यकर्त्यांकडून भांडी वाटप करण्यात आली आहे. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घटना उघडकीस आणली आहे. मात्र पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 हजार खात्यांची तपासणी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 हजार खात्यांची तपासणी करण्यात आली आहे. द्वेष पसरवणाऱ्या ३० पोस्ट हटवल्या आहेत. खाती बंद करण्यासाठी ही प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली आहे.

कल्याण पूर्व विधानसभेत फडणवीसांची आज सभा

कल्याण पूर्व विधानसभेत फडणवीसांची आज सभा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी फडणवीसांची सभा होत आहे. पदाधिकाऱ्यांकडून सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com