पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेनंतर नाना पटोले म्हणाले; ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेनंतर नाना पटोले म्हणाले; ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’

Published by :
Published on

देशात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील 'आप' करत आहेत. यांनी गलिच्छ राजकारण देखिल केले आहे. अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली आहे. या पक्षांनी अतर राज्यांतून आलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यामुळे कोरोनाचा हाहाकार झाला. याशिवाय त्यांनी काँग्रेसलं वर चांगलेच टीकास्त्र सोडलं होतं. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपावरुन काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, देशातील जनता अडचणीत असताना काँग्रेस कार्यकर्ते लोकांची मदत करत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशाची संपत्ती विकत होते. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. यासोबतच ते म्हणाले की, असंवेदनशीलतेच्या सर्व मर्यादा त्यांनी पार केल्या आहेत. जगात कोरोनाचे रूग्ण मिळाले तेव्हा राहुल गांधी उपाययोजना करण्यास सांगत होते. तर, पंतप्रधान नमस्ते ट्रम्प करण्यात व्यस्त होते. पंतप्रधानांनी केलेल्या बेजबाबदार वर्तनामुळेच देशात कोरोनाचे रूग्ण वाढले असा आरोप पटोलेंनी मोदींवर लावला आहे.

काँग्रेस कार्यकर्ते मदत करत होते त्यावेळी पंतप्रधान लोकांना टाळ्या, थाळ्या वाजवायला सांगून देशाची संपत्ती आपल्या उद्योगपती मित्रांना वाटत  होते. पंतप्रधानांचे हे वागणे म्हणजे 'उल्टा चोर कोतवाल को डांटे' असे आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com