मनोरंजन
SHERHSAH| कियारा, सिद्धार्थ आणि करण जोहर कारगिलकडे रवाना, प्रमोशनला सुरुवात..
आभिनेत्री कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा आणि करण जोहर हे कलिनाच्या विमानतळावर स्पॉट झाले आहेत. 'शेरशाह' या चित्रपटाची ही टीम कारगिलसाठी रवाना झाल्याची बातमी मिळत आहे. शौर्य दिनाच्या निमित्ताने २६ जुलै रोजी 'शेरशाह' चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे. हा चित्रपट कारगिलमध्ये तैनात असलेल्या सैनिकांवर आधारित आहे.
'शेरशाह' चित्रपटाची टीम द्रास सेक्टरमध्ये या चित्रपटाचं प्रमोशन करणार असल्याचं बोललं जातंय. भारतीय सैन्यासोबत वेळ घालवून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्याचा त्यांचा मानस आहे.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद 26 जुलै रोजी कारगिलकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे कारगिलमध्ये कोणताही फ्लाय झोन नसेल. त्यामुळे सिद्धार्थ, कियारा आणि करणची फ्लाइट लेहला पोहोचेल आणि यानंतर त्यांना रस्त्याद्वारे कारगिलकडे मार्गक्रमण करावं लागणार आहे.