‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधली माधवी भिडे आहे कोट्यवधींची मालकीन

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधली माधवी भिडे आहे कोट्यवधींची मालकीन

Published by :
Published on

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही गेली अनेक वर्ष लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि आत्माराम भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेतील माधवी भिडे ही भूमिका अभिनेत्री सोनालिका जोशी या साकारतात. गेली 13 वर्ष त्या या मालिकेत काम करत आहेत.

सोनालिका या डिझायनिंग बिझनेस सांभाळतात. त्यांचा मुंबईमध्ये 3 BHK फ्लॅट आहे. हा फ्लॅट घेण्याआधी सोनालिका या बोरीवली येथे 1 BHK फ्लॅटमध्ये राहात होत्या. सोनालिका यांच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यांच्याकडे जवळपास 18 लाख किंमत असणारी MG Hector ही गाडी आहे. तसेच Swanky Maruti आणि टोयोटा इटियॉस ही गाडी देखील त्यांच्याकडे आहे .

28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा कलाकार गुरुचरण सिंह यांनी काही दिवसांपूर्वी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सोनु भिडेचे ही भूमिका साकारणारी झील मेहता आणि टप्पू ही भूमिका साकारणारा भव्य गांधी या कलाकरांनी देखील मालिका सोडली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com