KK Death : लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान केके कॅमेऱ्यापासून दूर का असायचे ?
प्रसिद्ध गायक केके (Krishnakumar Kunnath) यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन क्षेत्राला आश्चर्याचा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका मैफिलीचं सादरीकरण झाल्यानंतर अगदी काही क्षणात मंगळवारी त्यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. 53 वर्षीय केके (कृष्णकुमार कुन्नाथ) यांनी हिंदी व्यतिरिक्त इतर काही भाषांमधील 500 हून अधिक गाण्यांना आपल्या आवाजाने सुरमय केले आहे. हा प्रसिद्ध गायकाबद्दल बोलायचं झालं तर हा गायक लाजाळू स्वभावाचा होता आणि ही गोष्ट फार कमी लोकांनाच माहीत असेल. केके हे बऱ्याचवेळा कॅमेऱ्या समोरे जाण्याचे अधिक प्रमाणात टाळायचे.
कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ केके हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायकांपैकी एक होते. केकेने आजवर त्यांच्या आवाजात अनेक गाणी गायलेली आहेत. त्यांनी मराठी, बंगाली, गुजराती, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि तमिळ गाण्यांना देखील आवाज दिला आहे. त्यांनी गायिलेली हिंदी चित्रपटातील गाणी अधिक प्रमाणात हिट झाली.
एका मुलाखती दरम्यान जेव्हा केकेला विचारण्यात आले होते की तो कॅमेऱ्यापासून इतका दूर का पळतो आणि तो लाइव्ह कॉन्सर्टमध्ये कसा परफॉर्म करतो. यावर केकेने उत्तर दिले की मला कॅमेऱ्याची फार चिंता वाटते. लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान कॅमेरा आपल्यावर फोकस करत असतो पण एकदा मी गाणे सुरू केले की मी कॅमेरासमोर आहे हे विसरतो.