कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी धनंजय महाडिक यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी धनंजय महाडिक यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

Published by :
Published on

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आलेले असतानाच पुण्यात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन झाले. याप्रकरणी माजी खासदार आणि भाजपा नेते धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या हडपसर येथे धनंजय महाडिक यांच्या मुलाचा रविवारी विवाह झाला. या विवाह सोहळ्यासाठी हजार ते बाराशे लोकांची गर्दी जमविल्याबद्दल भादंवि कलम 188, 269, 271 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना 2020चे कलम 11 अंतर्गत धनंजय महाडिक यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यासोबतच विवेक मगर आणि लक्ष्मी लॉन्सचे मॅनेजर निरुपल केदार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विवाहसोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी अनेकांनी मास्क घातला नव्हता तसेच तसेच सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com