The city of Varanasi is mentioned as one of the oldest temples in the world ... In our tradition, it is the cultural and spiritual capital.
The city of Varanasi is mentioned as one of the oldest temples in the world ... In our tradition, it is the cultural and spiritual capital.

बाबा भोलेनाथचे बदलते रूप

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

जगातील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले शहर म्हणून वाराणसी (Varanasi) शहराचा उल्लेख होतो… आपल्या परंपरेत ती सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी आहे… वाराणसीत काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath) म्हणजेच बाबा भोलनाथ (Baba Bholnath) यांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते…देशातील प्रमुख जोतिर्लिंगांपैकी (Jyotirlingas) महत्वाचे प्रमुख स्थान म्हणून काशीचे (kashi) महत्व आहे… मोक्ष मिळवण्यासाठी एकदा तरी काशीचे दर्शन करण्याची परंपरा हिंदु धर्मात ( Hindu Dharma) आहे… लोक येथे केवळ दर्शनासाठी येतात असे नाही, तर आयुष्यात मोक्ष प्राप्ती व्हावी ती इथेच आहे अशीही लोकांची धारणा आहे…

आत्तापर्यंत ज्यांनी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले असेल त्यांनी तेथील चिंचोळ्या गल्ल्या.. दाटीवाटीने असलेली दुकाने आणि दर्शनासाठी जाताना होणारी दुरावस्था अनुभवली असेल… देशातील प्रमुख देवस्थान असलेल्या काशीत स्वच्छता आणि सुसुत्रतेचा वर्षानुवर्षे अभाव होता… अनेक वर्षे हे स्थान जसे आहे तसेच होते. काशीतील पत्रकारांनीही काशी सुधारावी यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला… आपल्या कोकणातील बाबुराव पराडकर (Baburao Paradkar ) अनेक वर्षांपूर्वी काशीला गेले आणि तिथलेच झाले… याच मराठी पत्रकाराच्या नावाने काशीत बाबुराव पराडकर भवन आहे… काशी विश्वेश्वराच्या साक्षीने होणाऱ्या गंगा आरतीचे पाश्चातांना मोठे आरक्षण आहे…

वाराणसी (Varanasi) नजिकचे सारनाथ हे गौतम बुद्धांचे स्थानही परदेशी पर्यटकांचे तर शेकडो वर्षांपूर्वीचे नालंदा विद्यापीठ अनेक परदेशी विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरले आहे… गेल्या अनेक वर्षांपासून काशीचे रूपडे पालटण्याच्या चर्चा होत होत्या.. केंद्र आणि राज्यातील भाजपा (BJP) सरकारने काशी कॉरिडॉरची घोषणा करत काशीचा कायापालट सुरू केला अन् त्याला नवं रूप प्राप्त होत गेलंय… आता नव्याने झालेल्या या परिसरात लाखो लोक दर्शन घेऊ शकतील…. दहा हजार लोकांसाठी ध्यान करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ, सात भव्य प्रवेशद्वार, एक वैदिक आणि आध्यात्मिक ग्रंथालय. एक आभासी गॅलरी, पर्यटन केंद्र अशा एक ना अनेक सुविधा तयार केल्या आहेत… मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी ते करून दाखवले. कोणतीही कोर्टबाजी आणि तंट्याशिवाय त्यांनी लोकांना विश्वासात घेऊन वर्षानुवर्षे दाटीवाटीचा असलेला हा परीसर मोकळा करून दाखवला…. तेथील प्रचंड लोकसंख्या, स्थानिक लोकांची नाराजी, पुनर्वसानाचा वाद अशा असंख्य अडचणी असताना हा प्रकल्प पूर्ण होणं अशक्य समजलं जात होतं.

मालमत्तेच्या संपादनाची सर्वाधिक मोठी अडचण या प्रकल्पात होती. मात्र, सातत्याने लोकांशी संवाद साधूनच मार्ग काढा, लवचिक धोरण अवलंबा, धैर्य दाखवा, सर्व तक्रारी दूर करून या समस्यातून मार्ग काढा, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी प्रशासनाला दिल्या होत्या… त्यामुळे अनेक वाद, तक्रारी आणि खटले निकालात निघाले. सुमारे 400 कुटुंबांनी दिलेल्या दानामुळेच या प्रकल्पासाठी जमीन मिळू शकली… सौंदर्यीकरणाचा मार्ग खुला केला. विस्थापितांना दिलेल्या रकमेचा आकडा सुमारे ४०० कोटी इतका घसघशीत आहे. गेल्या सात वर्षांच्या काळात काशीचा झालेला कायापालट थक्क करणारा आहे. याकाळात सुमारे नऊ हजार कोटी खरंच झाले असून येत्या तीन वर्षात तेथे पाच हजार कोटी रूपयांची कामे अपेक्षित आहेत.. येथील इमारतींच्या दाटीमुळे येथे मेट्रो रेल्वे शक्य नसल्यामुळे स्वित्झर्लंडच्या धर्तीवर इथे केबल चालवली जाणार आहे. या योजनेवर ४०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

वाराणसीत गंगा ( (Varanasi ganga) तयावर एकूण ८४ घाट असून राजघाटाच्या पुढे खिडकीया हा ८५ वा घाट बनवण्यात येणार आहे. या घाटावर ओपन थिएटर, जिम आणि योगा सेंटर सारख्या सुविधा असतील. प्रदूषण कमी करण्यासाठी गंगेच्या पात्रात चालणाऱ्या दोन हजारपैकी २०० बोटींना सीएनजी इंजिन बसवण्यात आले आहे. गंगेच्या पात्रात पर्यटनाला गती देण्यासाठी क्रूझ चालवण्यात येत आहेत. त्यामुळे परदेशी पर्यटकांचे आणि परिणामी येथील स्थानिकांना रोजगाराचे प्रमाण वाढणार आहे… १३०० कोटी रुपयांचा रिंगरोड, विमानतळासाठी ९०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत… वाराणसीतील आणि मंदिर परिसरातील अडथळा असणारी बांधकामे हटवण्यात आली. परिसरातील ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तूचं संरक्षणही करण्यात आलं. जेव्हा इमारती जमीनदोस्त करण्याचं काम सुरू झालं तेव्हा श्री गंगेश्वर महादेव मंदिर, मनोकामेश्वर महादेव मंदिर, जौविनायक मंदिर, श्री कुंभ महादेव मंदिर अशी सुमारे 40 हून अधिक अधिक प्राचीन मंदिरे या तोडकामात सापडली. या मंदिराना एक इतिहास आहे.

अनेक युगांचा इतिहास त्यांनी पाहिलाय… ती आपल्या देशाची गौरवशाली परंपरा आहे. काशी विश्वनाथ कॉरिडोर हे एक माध्यम ठरलंय.. आपल्या नव्या भारताचा तो आधुनिक आणि आध्यात्मिक असा दुवा ठरणार आहे… काशीने आक्रमकांच्या या क्रूर यातनांचा अनुभव अनेकदा घेतलाय… काशी ही मोक्षाची भूमी आहे… इथे मृत्यूही भयकंपीत करत नाही. कणाकणात मांगल्याचा वास असलेली वाराणसी नगरी आता प्राचीन आणि नूतन, श्रद्धा आणि सौंदर्य यांचा अभूतपूर्व संगम बनते आहे.. अनेक दशकानंतर गंगेचे पात्र वाराणसीचा हा बदलता चेहरा पाहते आहे. ३५२ वर्षांनी जीर्णोद्धार या मंदिराचा जीर्णोद्धारक झालाय… काशीचा बदललेला चेहरा भारतीयांना आणि आपल्या धर्माल, देशाला नक्कीच नवी उर्जा देईल… जय बाबा भोलेनाथ..!

                                                                                      नरेंद्र कोठेकर, कार्यकारी संपादक, लोकशाही न्यूज

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com