टेकभेट : घरबसल्या आधार सोबत पॅन असे करा लिंक?
संकेत माने
भारत सरकारने वेळोवेळी आवाहन करून देखील अद्याप कित्येक लोकांनी त्यांचे आधार कार्ड Adhar card पॅन कार्डसोबत लिंक केलेले नाही. त्यामुळे सरकारद्वारे अनेक वेळा Aadhar Pan Link करण्यासाठीची शेवटची तारीख वाढवण्यात आली असून आता ३१ मार्च २०२२ ही आधार नंबर पॅन कार्ड Pan card सोबत लिंक करण्याची लास्ट डेट असणार आहे. आज या लेखात आपण आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक का केले पाहिजे? ते कसे करायचे? आणि लिंक आहे कि नाही हे कसे पाहायचे? याची सविस्तर माहिती घेणार आहोत.
आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक का केले पाहिजे?
शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आधार कार्डाचा तपशील पॅन कार्ड सोबत जोडणे अनिवार्य आहे. यापुढे इन्कम टॅक्स रिटर्न Income tax return फाईल करण्यासाठी आधार नंबर देखील द्यावा लागणार आहे. शासकीय सेवांच्या सवलती मिळवण्यासाठी तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक असायला हवे. उदा. गॅस सबसिडी, पेन्शन, स्कॉलरशिप, कर्ज इत्यादी शासकीय सेवांचा लाभ मिळवण्यासाठी हे गरजेचे आहे. आणि त्याहून महत्वाचे जर तुम्ही दिलेल्या तारखेपर्यंत आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक नाही केले, तर ते निष्क्रिय म्हणजेच बंद केले जाऊ शकते आणि तुम्हाला ते परत पूर्ववत करण्यासाठी कलम २७२बी अंतर्गत १०,००० रुपयांच्या दंड देखील भरावा लागू शकतो. या कारणांमुळे तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करायला हवे.
आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक कसे करायचे?
मोबाईल द्वारे एक एसएमएस SMS पाठवून अथवा इन्कम टॅक्स वेबसाईट वर फॉर्म सबमिट करून ऑनलाईन पद्धतीने आपण आधार नंबर पॅन कार्ड सोबत लिंक करू शकता. त्याचप्रमाणे जवळच्या पॅन सुविधा केंद्रावर जाऊन ऑफलाईन Ofline पद्धतीने आवश्यक ती कागदपत्रे जमा करून देखील लिंक करू शकता. जर ऑनलाईन Online पद्धतीचा वापर तुम्ही करत असाल तर तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. खाली दिलेल्या स्टेप्स फोल्लो करून आपण हे करू शकता.
SMS द्वारे आधार नंबर पॅन कार्ड सोबत लिंक करणे:
तुमच्या मोबाईल वरून 56161 किंवा 567678 या नंबर वर UIDPAN<स्पेस><12 अंकी आधार नंबर><स्पेस><10 अंकी पण नंबर> उदाहरणार्थ: UIDPAN 123456789123 ABCDE2124M अश्या फॉरमॅट मध्ये एसएमएस पाठवा.
ऑनलाईन आधार नंबर पॅन कार्ड सोबत लिंक करणे:
स्टेप १: गुगल वर इन्कम टॅक्स इंडिया इ फायलिंग सर्च करा किंवा https://www.incometax.gov.in/iec/foportal या भारतीय आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
स्टेप २: डाव्या बाजूला लिंक आधार हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा. आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी लागणारा फॉर्म उघडला जाईल.
स्टेप ३: तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्डचा तपशील भरा. तुमचे आधार कार्ड वरील नाव जसेच्या तसे टाईप करा. तुमच्या आधार कार्डावर जर संपूर्ण जन्मतारीख नसेल फक्त जन्मवर्ष असेल तर I have only year of birth in Aadhar card हा पर्याय निवडावा.
स्टेप ४: अचूक कॅप्टचा टाकून अथवा ओटीपी द्वारे व्हेरिफिकेशन करून लिंक आधार या बटनावर क्लिक करा. जर कॅप्टचा लोड होत नसेल तर बाजूला दिलेले रीलोड इमेज या आयकॉन वर क्लिक करा.
लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.