Sant Rajinder Singh Ji Maharaj
Sant Rajinder Singh Ji MaharajTeam Lokshahi

संत वाणी : जीवनाच्या ध्येय पूर्तीसाठी संपूर्ण समर्पण

नियमित रूपाने ध्यानासाठी योग्य वेळ दिला तर आपली मनासारखी प्रगती
Published on

संत राजिंदर सिंह जी महाराज

जर आपण सर्व युगांमध्ये आलेल्या संत-सद्गुरूंच्या जीवनावरती आपण नजर फिरविल्यास सर्वांमध्ये एक असा गुण दिसून येईल जो त्यांच्या यशासाठी अती आवश्यक होता. असे नव्हते की ते अलौकिक क्षमता घेऊन जन्मास आले होते. असे नव्हते की ते मानवापेक्षा काही अधिक होते. इतरांपेक्षा एक वेगळा गुण त्यांच्यात होता तो म्हणजे अध्यात्मिक धेय पूर्ती करिता संपूर्ण समर्पण. त्यांनी आपली नजर आपल्या ध्येयावरती टिकऊन ठेवली आणि ते तोपर्यंत थांबले नाहीत जोपर्यंत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले नाहीत. जीवनामध्ये कोणतीही ध्येय प्राप्तसाठी काय लागते. ते म्हणजे उन्हाळा असो वा पावसाळा, समुद्र शांत असो वा वादळी आपल्याला आपल्या ध्येयावर टिकून राहायचे आहे. हे खरे आहे की, आपण अध्यात्मिक ध्येय प्राप्त करू इच्छित असू किंवा भौतिक प्राप्ती करू इच्छित असू, ज्या लोकांनी क्रीडा, विज्ञान किंवा कला क्षेत्रामध्ये ध्येयपूर्ती केली त्यांनी ध्येयासाठी केलेल्या समर्पणाचे परिणामत: आश्‍चर्यजनक यश प्राप्त केले.

 Sant Rajinder Singh Ji Maharaj
ही वेळही निघून जाईल

जर आपण ध्यान अभ्यासाकरिता दृढ संकल्पाद्वारे समर्पित झालो तर आपणही सफल होऊ. समस्या ही नाही की, आपण अध्यात्मिक सामर्थ्य बाळगत नाही. कारण ही देणगी आपल्यापैकी प्रत्येकाला प्राप्त आहे. परंतु समस्या ही आहे की, आपल्यामध्ये समर्पण भाव नाही. एखाद्या दिवशी काही मिनिटाकरिता आपण ध्यान टिकवितो. पुन्हा पुढील काही दिवस आपण बिलकुल अभ्यास करत नाही. तेव्हा पुढील काही दिवस एक तास ध्यान अभ्यास करतो. असेही होऊ शकते की काही खास दिवसांमध्ये आपण पुन्हा जास्त वेळे करिता ध्यान अभ्यास करू. हे खरे समर्पण नव्हे. हा केवळ अर्ध मनाने केलेला प्रयत्न आहे. परंतु जर आपण नियमित रूपाने ध्यानअभ्यासासाठी योग्य वेळ दिला तर आपली मनासारखी प्रगती होईल. जे खरोखर अध्यात्मिक विकास करू इच्छितात, दृढ संकल्प करून टिकून राहतात तेच अध्यात्मिक मंडलांवर झेप घेऊ शकतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com