संत वाणी : नम्रतेचे सामर्थ्य
काही लोकांना असे वाटते की, ते एवढे महान आहेत की ते घरगुती दैनंदिन कामे, श्रमिकांची कामे किंवा आपल्या ऑफिस मधील कार्यालयीन छोटी छोटी कामे करणे त्यांचे काम नव्हे. आपण स्वतःला मोठे व महत्वपूर्ण समजतो. आपण खरोखरच महान व्यक्तींच्या जीवनामध्ये अविश्वसनीय नम्रता पहातो, हे रोचक आहे जे लहान श्रमिकांच्या बरोबर कार्य करण्यास ते तत्पर असतात.
जेंव्हा एखाद्याला असे वाटते की आपण किती महत्त्वपूर्ण आहोत किंवा आपला अहंकार वाढीस लागला तर आपण महान व्यक्तीं विषयी विचार करावा, ज्या विनम्र होऊन मानवतेच्या सेवेत सलग्न राहतात. कोणीही इतका महान नसतो की तो आपल्या शेजारच्याचे दुःख, त्रास वाटून घेऊ शकत नाही. आपण कधीही इतके मोठे नसतो की आपण कोण्या गरजवंताला आपल्या मदतीचा हात पुढे करू शकत नाही. शेवटी प्रभू आपणास जीवन देतात. हे प्रभूच आहेत जे आपल्या जीवनाला सफल करतात आणि आपल्यावर बक्षिसांची लयलूट करतात. प्रभु विना आपण काहीही नाही. हे प्रभूच आहेत जे आपणास ते बनवतात जे आपण आहोत.
जर दुसऱ्याची मदत करू शकलो तर आपल्याला समजेल की, प्रभू आपल्यावर भरपूर आशिर्वादांचा वर्षाव करण्याकरता तत्पर असतात.