संत वाणी : स्वता:कडे पाहणे म्हणजेच आत्मनिरीक्षण
आत्मनिरीक्षण याचा अर्थ स्वतःला तपासणे होय. आपण प्रत्येक दिवशी आपले विचार, वचन आणि कार्याचे निरीक्षण केल्याने आपण ओळखू शकू की आपण कोठे उभे आहोत? आपल्या लक्षात येईल की आपल्या आत्म्यावर अनेक डाग आहेत, ज्याला आपण साफ केलं पाहिजे. आपल्या मनामध्ये चोवीस तास उलट-सुलट विचार येत असतात, ज्यामुळे आपण दिवसभरात उलट-सुलट वचन आणि कृती करत असतो. हे सर्व आपल्या प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार आणि असत्य वचन, हे सर्व अवगुण आपल्या मनात प्रत्येक वेळी खळबळ माजवत असतात. जर आपण या नकारात्मक विचारांवर नियंत्रण केले तर आपले मन स्थिर आणि शांत होईल.
या अवगुणांना दूर ठेवण्यासाठी पहिले पाऊल हे की आपण आपल्या उणिवांची जाणीव ठेवली पाहिजे, तेव्हाच आपल्या विचारावर, वचनावर आणि कृतीवर लक्ष ठेवू शकू आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या प्रकारे आपण अध्यापकांकडे जातो तेव्हा त्यांच्याकडून काही शिकण्या अगोदर ते आपल्या बुद्धिमत्तेची (intelligence) चाचणी घेतात. ठीक याचप्रकारे जेव्हा आपण पूर्ण गुरूंच्या जवळ जातो, तेव्हा ते आपल्या मनावरील अवगुणांचा अंदाज घेतात आणि याच बरोबर ते या अवगुणां पासून आपल्याला दूर करण्याचा उपाय सुद्धा सांगतात की आपण आपल्या दोषांची समीक्षा केली पाहिजे. याचा अर्थ स्वतःला आरशात पाहण्या सारखं आहे त्यामुळे आपण आपल्यातील उणिवा शोधू शकतो. ज्यामुळे आपण हळूहळू त्यावर विजय प्राप्त करू शकतो.
ही समीक्षा स्वतःला कोसण्या करिता नसून, स्वतःला चांगले बनविण्यासाठी केली पाहिजे. हि समीक्षा आपल्या निराशेचे आणि अनादराचे कारण होता कामा नये. परंतु जेथे जेथे आपण कमी आहोत, तेथे आपण चांगले बनून आपल्या ध्येयप्राप्ती करण्यासाठी ती आपल्याला सहाय्यक झाली पाहिजे.
ध्यान-अभ्यासा द्वारे आपण सद्गुणांच्या स्त्रोताच्या संपर्कात येतो आणि आपल्यातील अवगुणांची सुधारणा करण्याची प्रक्रिया तेज होते. प्रभूची पवित्र करणारी प्रेमळ धारा आपल्या अवगुणांना काढण्यात साहाय्यक होते. अशा प्रकारे आपले जीवन संपूर्ण शांती, आनंद आणि प्रेमाने भरून जाते.