Sant Rajinder Singh Ji Maharaj
Sant Rajinder Singh Ji MaharajTeam Lokshahi

संत वाणी : खरी प्रसन्नता आपल्या अंतरी आहे

आपण आपल्या जन्मापासूनच दुःखी असावे असे इच्छित नाही.
Published by :
Team Lokshahi
Published on

- संत राजिन्दर सिंह जी महाराज

आपण आपल्या जन्मापासूनच दुःखी असावे असे इच्छित नाही. आपण नेहमी प्रसन्नता आणि समाधान प्राप्त करू इच्छितो. त्याकरिता आपण आपला परिवार, मित्र आणि प्रिय जनांवर प्रेम करतो आणि आपण त्यांच्याशी बंधुत्व भावाने व्यवहार करून त्यांच्यातच आपली प्रसन्नता शोधतो. आपण बाह्य जगाच्या धन-दौलतीत आणि नातेसंबंधात सुद्धा खुशी शोधण्याचा प्रयत्न करतो. जर आपण याचे विश्लेषण केले तर आपल्या लक्षात येईल की, या सर्वांपासून आपल्याला काही वेळेकरता खुशी मिळते, परंतु ठीक याच्या उलट धन-संपत्तीचा नाश आणि नातेसंबंध तुटल्याने आपल्याला अत्यंत क्लेश आणि दुःखाची सुद्धा अनुभूती होते.

उदाहरणार्थ, जर आपले घर आगीत जळाले तर, आपल्याला असे वाटते की आपण सर्वस्व गमाविले आहे. जर आपण करोडपती असू आणि अचानक आपले दिवाळे निघाले तर, आपण निराश होतो आणि जर आपल्या एखाद्या प्रिय जनाचा मृत्यू झाला तर, आपण शोकात डुबून जातो. पैसा, धन-दौलत इत्यादी आणि आपल्या प्रियजनांच्या जवळीकतेमुळे जी खुशी आपणास मिळते, त्यांच्या दूर जाण्याने तीचे दुःखात रूपांतर होते.

जीवनाच्या कोणत्या न कोणत्या एखाद्या वळणावर आपणास याचा प्रत्यय अवश्य येतो की, या बाहय जगतातील सर्व खुशी अस्थाई आहेत. जो पर्यंत आपण या जगात प्रसन्नता शोधतो तो पर्यंत आपणास निराशाच पदरी पडेल कारण की, या भौतिक दुनियेत सर्व काही नश्वर आहे. अंती आपल्याला सुद्धा आपल्या भौतिक शरीराच्या अंताचा सामना करावा लागेल आणि आपले सर्व काही इथेच सोडून जावे लागेल. हीच दुनियेची जगरहाटी आहे. जीवनाच्या वास्तविकतेकडे पाहिल्यावर आपण असा विचार करू लागतो की या भौतिक जगात खरी प्रसन्नता प्राप्त करण्याची काही आशा आहे का? आपण या जगात स्थाई खुशी कशी आणि कुठे प्राप्त करू शकु?

शतकानुशतके महान संत महापुरुष सांगत आले आहेत की खरी खुशी बाह्य वस्तूमध्ये नाही तर, ती आपल्या अंतरीच मिळू शकते. शाश्वत खुशी प्रभूची अशी देणगी आहे जिला वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी नष्ट करू शकत नाही. त्या प्रसन्नतेला आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. शाश्वत प्रसन्नतेचे केवळ एकमात्र साधन परमात्मा हेच आहे. सर्व संत महापुरुषांनी परमात्म्याला 'सत्, चिद् आनंद' स्वरूपात संबोधिले आहे. या महापुरुषांनी आपल्या अंतरी परमात्म्याचा अनुभव घेतला आणि याचा संदेश सर्व मानव जातीला दिला. त्यांनी आपणास शिकविले की, परमात्मा प्रेम, ज्योती आणि चैतन्याचा महासागर आहे. आपण सर्व आत्मे परमात्म्याचा अंश आहोत. जेव्हा आपण आपल्या वास्तव रूपाला ओळखतो, तेव्हा आपण आनंदाच्या स्रोताशी जोडले जातो.

Sant Rajinder Singh Ji Maharaj
संत वाणी : आत्मा आणि भूमंडलाचे पर्यावरण

आनंदाच्या या स्रोताशी जोडले जाणे सोपे आहे, हा आपल्या केवळ ध्यानाचा विषय आहे. आपण जिथे पाहिजे, तिथे आपले ध्यान लावू शकतो. अध्यात्मिक गुरु आपल्याला ध्यान एकाग्र करण्याची कला शिकवितात. यामध्ये आपणांस आपले ध्यान दोन डोळ्यांच्या भृकुटी मध्ये शिवनेत्रावर टिकवावे लागते. यालाच ध्यानाभ्यास म्हटले जाते. जर आपण बाह्य जगापासून काही वेळा करिता ध्यान हटवून शिवनेत्रावर एकाग्र केले तर, आपण खुशी आणि आनंदाच्या स्रोता शी जोडले जातो, जे आपल्या अंतरी आपली प्रतीक्षा करीत आहेत.

दररोज दोन तास अशा प्रकारे ध्यान टिकविल्या ने आपण देह भासाच्या वर यायला शिकतो. सर्व साधारण पणे चैतन्याच्या प्रवाहाद्वारे आपल्या शरीराला दुनियेतील बाह्य गोष्टींची माहिती होते. जसे पहाणे, ऐकणे, चवघेणे, वास घेणे आणि स्पर्श करणे. इंद्रियांद्वारे आपण सुंदर दृश्य पाहतो, मधूर आवाज ऐकतो, सुगंधाचा आनंद घेतो, चविष्ठ भोजन करतो आणि स्पर्शेइंद्रिया द्वारे सुखद अनुभूती घेऊ शकतो.

जर आपण आपल्या आत्म्याच्या चैतन्याच्या प्रवाहाला बाह्य जगतातून हटवून शिवनेत्रा वर एकाग्र केले तर दिव्यज्योती आणि श्रुती च्या एका नवख्या दुनियेचे दालन आपल्या करिता उघडले जाते. तेव्हा कुठे आपण आपल्या अंतरी प्रभूच्या ज्योती आणि श्रुती चा अनुभव करू शकू, जी सृष्टीची रचना करताना परमात्म्या पासून निघाली होती. जेव्हा आपला आत्मा प्रभु च्या चैतन्याच्या प्रवाहाच्या संपर्कात येतो, तेव्हा तो आपल्या स्रोत असणाऱ्या परमात्म्या जवळ पुन्हा परत जातो.

आत्मा स्थायी खुशीच्या यात्रेची सुरुवात ध्यान-अभ्यासाद्वारे करतो. आपला आत्मा सदैव चेतन आणि आनंदमयी अवस्थेत राहतो. जेव्हा आपण या अद्भुत प्रसन्नतेचा अनुभव करतो तेव्हा आपल्या भौतिक दुनियावी वासना कमी होऊ लागतात. जे लोक ध्यानाभ्यास करतात ते आपले ध्यान दुःखाच्या प्रसंगी सुद्धा प्रसन्नते च्या स्रोतावर टिकवून ठेवू शकतात. हे अगदी खरे आहे की अशा वेळी ते सुद्धा जीवनाच्या दुःख-क्लेश प्रसंगातून जातात परंतु, त्याच्या पासून ते प्रभावित होत नाहीत तर, आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येला ते सहजतेने सोडविण्यात सक्षम होतात. जेव्हा आपण ध्यान-अभ्यास करतो आणि आपल्या अंतरी प्रभू प्रेम आणि प्रसन्नतेचा सानिध्यात येतो, तेव्हा आपण हे इतरांना सुद्धा वाटायला सुरुवात करतो ज्यामुळे आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आपण खऱ्या अर्थाने खरे मानव बनतो.

Sant Rajinder Singh Ji Maharaj
संत वाणी : आपण  कधीही एकटे नसतो
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com