Sant Rajinder Singh Ji Maharaj
Sant Rajinder Singh Ji MaharajTeam Lokshahi

संत वाणी : आपल्या दैनंदिन अंदाजपत्रकात अध्यात्मिकता आहे का?

जगभरातील लोक आपले लक्ष अर्थव्यवस्थेवर केंद्रित करतात आणि आपलं उत्पन्न आणि आवश्यक खर्चासाठी शेवटी जमाखर्च बनवितात.
Published by :
Team Lokshahi
Published on

- संत राजिन्दर सिंह जी महाराज

जगभरातील लोक आपले लक्ष अर्थव्यवस्थेवर केंद्रित करतात आणि आपलं उत्पन्न आणि आवश्यक खर्चासाठी शेवटी जमाखर्च बनवितात. या शिवाय एक वेगळे अंदाजपत्रक आहे त्यावर आपण विचार करू शकतो. आपल्याला पाहिले पाहिजे की या भौतिक संसारात आपण काय जमा करत आहोत? या संसारात आपल्याला जगण्यासाठी श्वासाची निश्चित संख्या दिली आहे. आपण लक्षपूर्वक पाहिले पाहिजे की श्वासाच्या पुंजीचा आपण कसा उपयोग करत आहोत? अथवा प्रभूने दिलेल्या या दिव्य-दाना चे अंदाजपत्रक कसे बनवित आहोत?

ही स्वतःलाच विश्लेषण करण्याची चांगली संधी आहे, की आपण या श्वासाचा या पेक्षा चांगला उपयोग करू शकतो का? आपण आपल्या जीवनावर एक दृष्टिक्षेप टाकून पाहिले तर आपण आपला वेळ विनाकारण आणि व्यर्थ खर्च करत आहे का? किंवा आपण याला कोणत्या ध्येयासाठी खर्च करत आहोत?

आपल्याजवळ दिवसाचे चोवीस तास आहेत. आपली काही श्वासाची पुंजी जीवनाच्या गरजा जसे अन्न, वस्त्र आणि निवारासाठी खर्च होते. काही श्वास शरीराच्या काही नेहमीच्या परीश्रमामध्ये खर्च करतो. आपल्याला आपला वेळ शरीराची काळजी जसे जेवण, स्नान, तयारी करणे, झोपणे आणि शारीरिक श्रमामध्ये सुद्धा खर्च करावा लागतो. आपल्याला नेहमीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे कमवायला वेळ द्यावा लागतो.

आपल्याला नोकरीसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी आपण शाळेत अथवा कॉलेजमध्ये जावे लागते. आपल्याला आपल्या परिवाराची काळजी घेण्याची आवश्यकता असते. आपण समाजासाठी काही योगदान देऊ इच्छितो आहे अथवा दुसऱ्यांना साहाय्य करू इच्छितो तेव्हा या सर्व कार्यासाठी आपला पुष्कळसा वेळ खर्च होतो. या शिवाय आपल्या जवळ जो वेळ शिल्लक राहतो, तो आपण आपल्या इच्छेनुसार खर्च करू शकतो. आता आपल्याला हे पाहावे लागेल की या शिल्लक राहिलेल्या वेळेचा सर्वोत्तम उपयोग करण्यासाठी आपण कशा प्रकारे अंदाजपत्रक करू शकतो?

Sant Rajinder Singh Ji Maharaj
संत वाणी : आत्मा आणि भूमंडलाचे पर्यावरण

संत-महापुरुषांच्या शिकवणुकींनुसार अध्यात्मिक मार्ग अनुसरण करणारे लोक याच जीवन काळात आत्मज्ञान आणि परमात्मा प्राप्तीचे ध्येय निश्चित करतात. संत-महापुरुष आपल्याला शिकवितात की या जीवनानंतर काय होईल? हे जाणण्यासाठी आपल्याला मृत्यूची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. आपण याच जीवनांत जिवंतपणी मरणाची कला शिकून आपल्या अंतरी अध्यात्मिक मंडळ पाहू शकतो. आपण ध्यान-अभ्यासा द्वारे शांत अवस्थेमध्ये बसून आपल्या अंतरी अध्यात्मिक धन-दौलत प्राप्त करू शकतो. यासाठी आपल्याला दररोज ध्यान-अभ्यासासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. आपण यासाठी पुरेसा वेळेचा संकल्प केला आहे का?

आत्म्याची काळजी :-

ध्यान-अभ्यासासाठी दररोज अभ्यासाची आवश्यकता आहे, ज्यामुळे आपण आपल्या अंतरी प्रभूच्या दिव्य-ज्योति आणि श्रुतिशी जोडले जाऊ शकतो आणि यापेक्षा पुढच्या मंडळात सुद्धा जाऊ शकतो. अंतरी ध्यान टिकविण्यासाठी नित्य सराव केल्याने आपण यात निपुणता प्राप्त करू शकतो. जसे जीवनात बाकी कार्यात सुद्धा यश मिळवण्यासाठी आपणास सरावाची आवश्यकता असते. ठीक अशाप्रकारे आध्यात्मिक जमाखर्च योजना बनविण्यासाठी किंवा परमात्मा-प्राप्तीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी, आपल्याला ध्यान-अभ्यासासाठी दररोज काही वेळ देणे आवश्यक आहे. ज्या प्रकारे आपण बाहेरच्या जगात आर्थिक जमा खर्च बनवितो, त्याचप्रमाणे आपण आपल्या रोजच्या जीवनात ध्यान-अभ्यासाला समाविष्ट करून आध्यात्मिक जमाखर्च बनविला पाहिजे, कारण आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेण्याची आपली जबाबदारी पारपाडतांना आपण आपल्या आत्म्याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे.

यासाठी आपण आपल्या वेळाचे विश्लेषण करावे ज्यासाठी आपण एक यादी बनू शकतो, की आपण आपल्या जीवनात आवश्यक कामधंद्यासाठी किती वेळ खर्च करणार आणि किती वेळ आपण आध्यात्मिकतेसाठी देणार आहोत? बरेसे लोक आपल्या कामाच्या यादीमध्ये दुनियाच्या कार्याला प्रथम स्थान देतात आणि ध्यान-अभ्यासाला शेवटचे स्थान देतात. चला तर! आपण सर्वात प्रथम ध्यान-अभ्यासासाठी आपला वेळ सुनिश्चित करूया, परत अन्य सर्व जबाबदाऱ्याना पूर्ण करण्यासाठी वेळ निर्धारित करू या.

तेव्हाच आपण पूर्ण रूपाने सांगू शकतो की ध्यान-अभ्यास आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण भाग आहे. काही लोक दिवसाची सुरुवात सकाळी ध्यान-अभ्यासासाठी देतात कारण दिवसाच्या बहुतेक वेळ त्यांना आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात खर्च होतो. जसे की रात्री थकल्या कारणामुळे ध्यान-अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नाही. यासाठी हेच खर आहे की आपण आपल्याला दिवसाची सुरवात ध्यान-अभ्यासाला प्राथमिकता देऊन करावी आणि आणि ध्यान अभ्यासाला दिवसाच्या शेवटला करण्यासाठी सोडू नये.

जर आपण ध्यान-अभ्यासाला आपल्या जीवनात एक महत्त्वपूर्ण भाग बनविला तर ही आपली चांगली सवय होईल, तेव्हा आपण आपल्या वेळेचा सर्वोत्तम उपयोग करू शकू. ज्यामुळे, आपण आध्यात्मिकतेचा फायदा घेऊ, ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व पैलूंची शारीरिक, मानसिक व सामाजिक समृद्धी होईल.

Sant Rajinder Singh Ji Maharaj
संत वाणी : आपण  कधीही एकटे नसतो
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com