Sant Rajinder Singh Ji Maharaj
Sant Rajinder Singh Ji MaharajTeam Lokshahi

संत वाणी : आत्मा आणि भूमंडलाचे पर्यावरण

सृष्टीच्या प्रारंभापासूनच निसर्गाच्या अद्भुत संतुलनाद्वारे या धरतीवर जीवन कायम आहे
Published by :
Team Lokshahi
Published on

- संत राजिन्दर सिंह जी महाराज

सृष्टीच्या प्रारंभापासूनच निसर्गाच्या अद्भुत संतुलनाद्वारे या धरतीवर जीवन कायम आहे, जे आजच्या आधुनिक युगामध्ये नवनवीन तांत्रिक कारणांमुळे धोक्यात आले आहे.संचार माध्यम आपणास दररोज वातावरणात निर्माण होणाऱ्या धोक्याविषयी माहिती देतात.'हवा' जिच्यामुळे आपण श्वास घेतो, 'पाणी' जे आपण पितो आणिधरतीज्याच्याकडूनआपल्यासभोजनप्राप्तहोते,हे सर्व हळूहळू प्रदूषित होत आहे.अशा परिस्थितीत पर्यावरणाविषयी विचार करणे आणि त्याच्या संरक्षणाविषयी कार्य करणे, हा पूर्ण विश्वा करिता एक महत्त्वाचा विषय आहे.

या विषयाचे आपण चार विभाग करूया. निसर्गाच्या चक्राला समजणे,प्रदूषणा च्या विपरीत परिणामांविषयी जागरुकता, निसर्गाचे सौंदर्य टिकविणेआणि अशा पद्धती शोधून काढाव्या जेणेकरून पृथ्वीवरील वातावरण स्वच्छ आणि शुद्ध राहील.या व्यतिरिक्त आपण आत्मिक पर्यावरणाचे सुद्धा विश्लेषण करावे.बाह्य वातावरणात प्रमाणेच आपल्या आत्म्यावर सुद्धा काही मूळ नियम आणि चक्र लागू होतात, ज्याच्या द्वारे आपण हे जाणू शकतो की, प्रदूषणाचा आपल्या अंतरी आणि आजूबाजूच्या भौतिक परिस्थितीवर त्याचा काय परिणाम होतो. अंतरातील आणि भौतिक पर्यावरणा करिता आपणास या चार पैलूंचे अध्ययन करावे लागेल. निसर्गाची घडण एकदम अचूक आहे.या भूमंडलावर केवळ पृथ्वी पर्यावरणाला अनुकूल आहे, ज्यामध्ये पृथ्वी हा ग्रह जीवनास आधार देण्यास योग्य आहे.ठीक अशा प्रकारे केवळ या मानव शरीरात सुद्धा आपण आत्म्याचे पर्यावरण समजू शकतो.

 Sant Rajinder Singh Ji Maharaj
Gurupurnima : आत्म्याला परमात्यामाशी जोडण्यासाठी सतगुरु माध्यम

जसे निसर्गाचे चक्र, जलचक्र, वनस्पती चक्र आणि जीवाश्म इंधना प्रमाणे आत्म्याचे सुद्धा चक्र आहे.सृष्टीच्या निर्मितीबरोबरआत्म्याचा प्रवास सुरू झाला आणि हा आतापर्यंत समयानुसार चालत आहे. आपला आत्मा एक दिव्य ठिणगी प्रमाणे आहे आणि तोच आपणास अंतरातून जीवन देत आहे. ज्याप्रमाणे हिरा भूगर्भात खोलवर दडलेला असतो अथवा एक चांगल्या प्रतीचे इंधन धरतीच्या पृष्ठभागाच्या अगदी तळाशी प्राप्त होते, ठीक अशाच प्रकारे आपली अनमोल दौलत अर्थात आपला आत्मा मन आणि मायेच्या पृष्ठभागाच्या खोल गर्तेत आहे.

जोपर्यंत आत्मा शरीरात रहातो तो पर्यंत शरीर जीवित असते, जेव्हा आत्मा शरीराचा त्याग करतो तेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो. जेव्हा परमेश्वराने सृष्टीची रचना केली तेव्हा त्यांनी सर्व आत्म्यांना आपल्या पासून वेगळे केले, जेणे करुन ते या दुनियेमध्ये निवास करू शकतील.अशा प्रकारे आपल्या आत्म्याचा प्रवास सुरू झाला. जेव्हा परमात्म्याने आत्म्यांना आपल्या पासून वेगळे केले, तेव्हा त्याने या आत्म्यांना परत येण्याकरिता आपल्याशी एकरूप होण्याकरिता मार्गसुद्धा दाखविला. त्याने सांगितले की आपण सर्व आत्मे प्रभू च्या 'ज्योती'आणि 'श्रुती'शी जोडले गेल्यानंतर पुन्हा पिता परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो.

आंतरिक आणि बाह्य पर्यावरणाचा पुढील पैलू "प्रदूषण" आहे. हवा आणि पाणी यांच्या प्रमाणेच आत्मा सुद्धा स्वाभाविक रित्या पवित्र आणि सुंदर आहे. लाखो-करोडो वर्षांपासून या पृथ्वीवर शुद्ध हवा आणि स्वच्छ वाहते पाणी उपलब्ध आहे. आपल्या दुरुपयोगामुळे ही नैसर्गिक संसाधने दूषित झालेली आहेत. तशाच प्रकारे इंद्रियांच्या अतृप्त वासनांना शांत करण्याच्या कारणाने आपल्या आत्म्याची नैसर्गिक सुंदरता आणि शुद्धता दूषित झालेली आहे. आपला आत्मा मनाच्या अधीन झाल्यामुळे दुनियेच्या प्रभावात फसलेला आहे.सांसारिक गरजा आणि इंद्रिय सुख आपल्या शुद्ध आत्म्या वर धुळी प्रमाणे जमले आहे.

या विषयाचा पुढील पैलू आहे,"आत्म्याच्या सुंदरतेची पुनरावृत्ती". पर्यावरण वैज्ञानिक जे दूषित पाण्यालाआणि वायुमंडलाला शुद्ध करीतआहेत आणि लुप्त होणाऱ्या जनावरांच्या प्रजाती ना संरक्षण देत आहेत,ते आजच्या युगाचे नायक आहेत. अशाच प्रकारे, आपल्या आत्म्याच्या पर्यावरणाचे सुद्धा वैज्ञानिक आहेत, ज्यांनी आत्म्याचे वास्तविक प्रत्यक्ष सौंदर्य पाहिले आहे,तसेच धूळ आणि कचऱ्याच्या प्रदूषित करणाऱ्या थरांची त्यांचा चांगला परिचय आहे. या दैवी वैज्ञानिकांना आपण बर्‍याचदा संत, महात्मा आणि अध्यात्मिक गुरु या नावांनी जाणतो. जे स्वतःया प्रदूषण करणाऱ्या गोष्टींपासून अलिप्त आहेत.

संत आणि महात्मे आपल्याला आपले खरे स्वरूप दर्शवितात.आपण आपल्या आत्म्याला कसे जाणू शकतो तसेच मन आणि माया यांच्या प्रदूषणाच्या आवरणांपासून शुद्ध कसे राहू शकतो,हे ते आपल्याला शिकवितात.

आंतरिक आणि बाह्य शुद्धतेसाठी चौथा पैलू आहे,"आत्म्याच्या सुंदरतेला कायम राखणे". पर्यावरणा करिता समर्पित वैज्ञानिक वातावरणातील शुद्धता टिकवण्याकरता आपले कर्तव्य समजावितात ते आपणास सांगतात की आपण असे कोणतेही कार्य करू नये जेणेकरून निसर्गाचे संतुलन बिघडेलआणि वातावरण प्रदूषित होईल. याचप्रकारे संत महापुरुष आपणास समजावतात की,आपण असे कोणतेही अनैतिक कार्य करू नये ज्यामुळे आपला आत्मा अशुद्ध होईल.

जसजसे आपण आध्यात्मिक पर्यावरणाला स्वच्छ करतो तसतसे आपला आत्मा निर्मळ आणि शुद्ध होत जातो. तेव्हाआपल्या आत्म्यावरील प्रदूषित करणारे थर दूर होतात आणि शेवटी तो पूर्णतः शुद्ध होतो. परिणामी तो परमपिता परमेश्वरात लीन होण्याकरीता सदैव तयार राहतो.

 Sant Rajinder Singh Ji Maharaj
Fathers Day : पितृदिन अध्यात्मिक लक्ष पुर्ण करावे
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com