संत वाणी : संत-महात्म्ये यांच्या प्रति कृतज्ञता
पदार्थ विज्ञानाचे शास्त्रज्ञ नेहमी समस्त जडपदार्थांना बनविणाऱ्या सूक्ष्मतम कणांच्या शोध व अध्ययनात गुंतलेले असतात. पार्टीकल एक्सीलेटर नावाच्या यंत्राच्या सहाय्याने “गॉड पार्टिकल” म्हणजेच “हिंग्स बोसॉन” चे शोध करतात. “लार्ज हैड्रॉन कॉलाईडर” नावाच्या विशालकाय वैज्ञानिक उपकरणाच्या सहाय्याने त्यावर ते प्रयोग करीत आहेत, जो स्वित्झरलँड आणि फ्रान्स यांच्या सीमेवरील जिनेवा येथे जमिनीपासून 100 मीटर खाली स्थित आहे.
संपूर्ण सृष्टीची रचना करणाऱ्या या गोड पार्टिकलला संतमहात्मे ध्यान अभ्यासाच्या प्रक्रियेत आपल्या आत्म्याच्या खोलवर अंतरात जाऊन त्याचा शोध घेतात. आज मानव दिव्य आणि जागृत अशा संत-महात्म्यांच्या शिवाय अध्यात्मा विषयी अज्ञानाच्या घोर अंधकारात आपण जीवन जगत आहोत. हे संत-महात्मे या विश्वात आपल्याला अज्ञानाच्या अंधारा पासून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी येतात. या महान संत-सत्पुरुषांचा उद्देश केवळ ज्ञान आणि विवेक प्रदान करण्याचा नसून आपल्याला अंतरातील विद्यमान प्रभूचा दिव्य प्रकाश आणि अलौकिक अनहदनादाशी जोडण्याचा देखील आहे.
आपण इतिहासात नजर टाकली असता लक्षात येते की असे महापुरुष या धरतीवर नेहमी विद्यमान असतात. ज्यांनी स्वतःला जाणलेलं आहे तसेच प्रभूची प्राप्ती केलेली आहे. आपण सर्वांनी अशा महान संत महापुरुषां प्रति कृतज्ञता बाळगली पाहिजे, जे आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातुन काढण्यासाठी या विश्वात येतात.
अध्यात्मिक परमानंदाच्या खजिना आपल्या सर्वांसाठी देणाऱ्या या महान संत महात्म्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. तसेच त्यांचे उपकार ही मानले पाहिजेत. ते केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर ते आपल्याला प्रसन्न आणि आनंदी अशा अवस्थेची अनुभूती देण्यासाठी येतात.
आपणास माझी विनंती आहे कि आपण परमेश्वराची अनुभूती घ्यावी. आपले जीवन पूर्ण आनंदाने जगावे. तसेच सर्व संत-महात्म्यांविषयी कृतज्ञता बाळगावी, जे आपणाला प्रभु ने दिलेल्या अनमोल जीवनाची ओळख करून देतात.