पुन्हा…पुन्हा….
नरेंद्र कोठेकर
महाराष्ट्राच्या राजकारणात 'मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन..' या दाव्याने महाराष्ट्रात(maharashtra) एक वेगळीच राजकीय हवा निर्माण केली होती… माजी मुख्यमंत्री(ex cm) देवेंद्र फडणवीस(devendra phadnvis) यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या(vidhansabha) प्रचारात जाहिरसभांचा अक्षरशः धुरळा उडवला होता… निवडणुकीत फडणवीस यांनी केलेल्या या दावाची राजकीय विरोधकांनी नंतर खिल्ली उडवली… फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलेल्या या निवडणुकीत भाजपाने(bjp) चांगले यश मिळवले.. मात्र, शिवसेना आणि भाजपाच्या त्या 'बंद दाराआड चर्चेने' जुळलेल्या युतीची मने पुरती दुभंगली आणि जुळलेला युतीच्या संसाराचा अखेर काडीमोड झाला…
पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी फडणवीस आणि भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठांनी 'ना भुतो ना भविष्यती' (यापुढे अन्य काहीही समीकरणे होवू शकतात, याची ही नांदी असू शकते…) असा पहाटेचा शपथविधी राजभवनावर उरकून घेत राष्ट्रवादीच्या(ncp) अजित पवार(ajit pawar) यांच्यासोबत सरकार बनवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.. त्यावेळीही फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन याची महाराष्ट्राला आठवण झाली… पण तो प्रयोग अवघ्या काही तासांचा ठरला आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली… राज्यात भाजपाचे सर्वाधिक आमदार असताना त्यांच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास मविआच्या(mahavikas aaghadi) राजकीय समीकरणातून हिरावून घेतला गेला… फडणवीस यांच्या स्वप्नातील मी पुन्हा येईन या दाव्याला मविआने पुरता सुरुंग लावला… त्यानंतर गेल्या सव्वादोन वर्षात देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन चा वापर खिल्ली करण्यासाठी करत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं… मधल्या काळात फडणवीस यांनी मी जनतेच्या मनालला मुख्यमंत्री असल्याचे विधान केलं… त्यावेळीही 'मी पुन्हा येईन' हा दावा राजकीय पटलावर विनोदाचा अजेंडा ठरला… भाजपाचे नेते जेव्हा जेव्हा मविआ सरकार पाडण्याची भाषा करतात तेव्हा तेव्हा या 'पुन्हा' चा उल्लेख करत भाजपा आणि फडणवीस यांना राजकीय लक्ष्य केलं जातं…. आता गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती. त्यांनी पहिल्यांदाच गोव्यात भाजपाची एकहाती सत्ता आणून दाखवली… मनोहर पर्रिकर गोव्याचे 'महिसा' म्हटले जात होते.. पण, त्यांना जी राजकीय किमया जमली नाही ती किमया फडणवीस यांनी करून दाखवली…
भाजपाला मॅजिक फिगरचा आकडा गाठता आला नसला तरी ते बहुमताच्या काठावर गेले… भाजपासाठी ही बाब राजकीयदृष्ट्या जमेची ठरली आहे… फडणवीस यांनी गोव्यात काही वेगळे राजकीय प्रयोग केले.. त्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे(pratapsinh rane) यांचा मुलगा विश्वजित राणे(vishwajit rane) जे आधी भाजपात होते, त्या पती-पत्नी यांना उमेदवारी दिली.. दिव्या राणे(diya rane) या महिला मतदार म्हणून गोव्यातून विक्रमी मतांनी विजयी झाल्या तर राणे यांनीही त्यांच्या मतदारसंघातून भरघोस मते घेतली… साहजिकच गोव्यात(goa) काही राजकीय उलथापालथ होणार अशी शक्यता निर्माण झाली..
विश्वजित राणे यांनी आपणही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे सुतोवाच आपल्या समर्थकांमार्फत दिल्लीतील(delhi) श्रेष्ठीपर्यंत पोहचवले… त्यासाठी त्यांनी दिल्लीवारीही केली… गोव्याचे आगामी मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव जाहिर केले होते… पण काही राजकीय गणिते जुळली आणि राणे यांनी त्यांचा एक दबावगट तयार केला.. सावंत हेच मुख्यमंत्री असतील असे बोलले जात असले तरी गेले पाच-सहा दिवस राणे यांच्या नावाची चर्चा गोव्यात सुरू झाली.. त्यासाठी गोव्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात दिल्लीचे दूत पाठवले… केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंग तोमर आणि एल मुरुगन यांनी सावंत यांच्या नावाबाबत अन्य आमदारांची मने वळवण्याचा प्रयत्न केला… मतदारांनी भाजपाच्या पदरात सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून मान दिला असतानाही विधिमंडळ नेता निवडीसाठी भाजपाला तब्बल अकरा दिवसांचा कालावधी घ्यावा लागला… सोमवारी गोव्याचे प्रभारी फडणवीस गोव्यात पोहचले आणि त्यांनी तेथे विधिमंडळ पक्षाची बैठक घेत अखेर डॉ. प्रमोद सावंत(pramod sawant) हेच आगामी मुख्यमंत्री म्हणून निवड जाहीर केली…(Pramod Sawant once again will be Chief Minister of Goa) सावंत यांच्या नावावर अखेरचे शिक्कामोर्तब होताच डॉ. सावंत यांनी 'पुन्हा आलो' चा नारा दिला… डॉ. सावंत यांच्या समर्थकांच्या 'पुन्हा आलो' या नाऱ्याने भाजपाच्याच नेत्यांमध्ये काही क्षणांसाठी 'चरर्र' झाले… याचे कारणही तसेच होते… कारण याच 'पुन्हा'च्या नाऱ्यामुळे महाराष्ट्रात भाजपा टिकेची धनी झाली होती… आता अन्य ठिकाणी भाजपाला महाराष्ट्राची झालेली पुनरावृत्ती नकोय… आता हवीय ती पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता… त्यासाठी भाजपानं कंबर कसली असून आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका भाजपा जिंकणारच असा दावा गेल्या दोन दिवसांपूर्वीच नागपुरात फडणवीस यांनी केलीय… 'मी पुन्हा येईन..' हा विश्वास त्यांनी अद्याप सोडलेला नाही..