कालाष्टमी व्रताबद्दल माहिती आणि पूजा मुहूर्त जाणून घ्या..
कालाष्टमी ही दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते. हा सण वर्षातून 12 वेळा साजरा केला जातो. काल भैरावाची यादिवशी पूजा केली जाते. तसेच यादिवसाला काल भैरव अष्टमी असेही म्हणतात. कालभैरव म्हणजे कालाचे भय दूर करणारा. त्याचप्रमाणे या दिवशी रूद्रावतार काल भैरवाचीही पुजा करण्यात येते. या दिवशी भगवान भैरवाचे भक्त व्रत पाळतात आणि कालभैरवाची विधिनुसार पूजा केली जाते. राजा दक्ष प्रजापतीला शिक्षा देण्यासाठी भगवान शिवने हे रूप धारण केले होते. काल भैरवाची या दिवशी पुजा केल्याने रोग, दोष आणि भय दूर होते. सध्या ज्येष्ठ महिना सुरू आहे. . या दिवशी भैरवबाबांना प्रसन्न करण्यासाठी भाविक उपवास करत असतात.
ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी 22 मे रोजी दुपारी 12:59 वाजता सुरू होईल आणि 23 मे रोजी सकाळी 11:34 वाजता कृष्ण पक्षाची अष्टमी समाप्त होईल. 22 मे रोजी कालाष्टमी व्रत पाळण्यात येणार असून 23 मे रोजी पारण केले जाणार आहे.यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी रविवार, 22 मे रोजी दुपारी 12:59 वाजता सुरू होईल आणि ही तारीख सोमवार, 23 मे रोजी रात्री 11.34 पर्यंत वैध आहे.
ब्रह्म मुहूर्तावर अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान केले जाते. त्यानंतर शिवमंदिरात जाऊन भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्यात येते. जर तुम्ही घरी असाल तर काळे आसन घालून देवी पार्वती आणि गणेशाच्या मूर्तीं ठेवून आणि भगवान शंकराची मूर्ती ठेवून नियमानुसार पूजा करावी आणि पूजा केल्यानंतर आरती करावी. नियमानुसार केल्याने कालभैरवाचे आपल्याला आशीर्वाद मिळतो.