घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या पाच ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या पाच ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Published by :
Published on

जळगाव शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला असून शहरात विविध भागात 5 ठिकाणी छापा टाकत 51 घरगुती सिलेंडर 6 ऑटो रिक्षा व इतर साहित्यासह असा 11 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बारा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून शहरात अवैधपणे घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू आहे. मात्र नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक पथकाने जिल्ह्यात कारवाई केल्यानंतर अखेर जळगाव पोलिसांनीही जाग आली असून जळगाव पोलिसांनी देखील आता धडक कारवाई सुरू केली आहे.

जळगाव शहरात प्रवासी रिक्षांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मधून मोठ्या प्रमाणात गॅस रिफिलिंग करून घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार केला जातोय. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे दोन दिवसापूर्वी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. जे बी शेखर यांच्या पथकाने कारवाई केली, त्यानंतर आता जळगाव पोलिसांनाही जाग आली असून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच दिवशी शहरातील विविध भागात 5 ठिकाणी छापे टाकत घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघडकीस आणला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com