Business
Aadhaar-Pan Linking | लेट लतीफांमुळे आयकर विभागाची वेबसाईटच झाली क्रॅश
आधार-पॅनकार्ड लिंक करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. यानंतर करायचे झाल्यास 1000 रुपये भरावे लागणार आहेत. तसेच पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. यामुळे उशिरा येणाऱ्या लोकांमुळे आयकर विभागाची वेबसाईटच झाली क्रॅश झाली आहे.
आयकर विभागाच्या वेबसाईटवर लेट येणाऱ्या व्यक्तीमुळे वेबसाईटवर ट्रॅफिक आल्याने आयकर विभागाची पॅन-आधार लिंक करण्याची लिंक क्रॅश झाली आहे. गेल्या तास-दोन तासापासून ही समस्या येऊ लागल्याने अनेक जणांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
आयकर विभागाने आधारला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार सूचना केली होती. गेल्या काही दिवसांपासून तशा बातम्याही सारख्या दिल्या जात होत्या. मात्र, तरीदेखील अनेकांनी लिंक केले नसल्याने त्यांच्या आजच्या एकाच दिवशी आयकर विभागाच्या वेबसाईटवर गर्दी केली आहे.