World Ocean Day : सुट्ट्यांमध्ये बीचवर जाण्याचा बेत करा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
World Ocean Day : जागतिक महासागर दिवस हा दरवर्षी ८ जून रोजी साजरा केला जातो. या संदर्भातला प्रस्ताव १९९२ मध्येच कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिकार परिषदेत मांडला. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने २००८ मध्ये मान्यता दिली. यंदाची जागतिक महासागर दिनाची थीम प्लॅनेट ओशन: टाइड्स चेंजिंग आहे.
जेव्हा लाटा समुद्रात उठतात तेव्हा त्याचा आवाज आपल्या मनाला आराम देतो. निळ्याशार समुद्र किंवा लाटांचा नुसता आवाज आपल्याला अपार शांतता देतो. समुद्रामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यालाही मोठा फायदा होतो. मानसिक आरोग्यासाठी समुद्राचे फायदे जाणून घेऊया.
'हे' आहेत समुद्र थेरपीचे फायदे
तणावाची पातळी कमी होते
जेव्हा तुम्ही पाण्याच्या संपर्कात असता तेव्हा तुम्हाला आनंदाची अनुभूती येते. ही भावना फक्त पायाची बोटे बुडवून किंवा पोहण्याने देखील मिळवता येतो. समुद्र सकारात्मक आयनांनी भरलेला आहे, ज्याचा मेंदूवर प्रभाव पडतो. त्याचा निळा रंग मनाला शांत करण्यास मदत करतो. यामुळे लोकांना शांततेची अनुभूती मिळते.
नैराश्य कमी करते
किनाऱ्यायावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज आणि पाण्यामुळे कोणत्याही नकारात्मक भावना लगेच मनातून निघून जातात. तुम्ही समुद्र किनाऱ्यावर 30 मिनिटे बसून शांतपणे लाटा पहा. या काळात तुम्हाला कोणतेही नकारात्मक विचार मनात येणार नाही.
सर्जनशीलतेला प्रोत्साहन देते
ओशो यांच्या मते, महासागर एखाद्याला सर्जनशील होण्यासाठी प्रेरित करू शकतो. अनेकदा तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर येताच तुम्ही एखादे गाणे वाजवू लागता. तुम्हाला काही चित्रे काढावीत किंवा काहीतरी क्रिएटिव्ह लिहावेसे वाटते. काही दिवस समुद्रकिनारी राहा. हे तुमच्या मनातील सर्व प्रकारचे विचार काढून टाकण्यास मदत करेल. यातून तुमच्या कला, काम किंवा व्यवसायात आवश्यक असलेल्या सर्जनशीलतेसाठी उपाय सुचतील.
महासागर प्रेरणा देतो
समुद्र पाहून पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. यामुळे चालणे, धावणे, पोहणे, बॉल खेळणे, स्नॉर्कलिंग किंवा कोणत्याही प्रकारचे जल क्रियाकलाप होऊ शकतात. याच्या मदतीने तुम्ही सक्रिय राहू शकता. शरीर सक्रिय असताना आनंद संप्रेरक तयार करते, यामुळे तुम्हाला ताजेतवाने आणि चिंतामुक्त वाटते.