जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो? 2022ची थीम काय? जाणून घ्या
World Environment Day : पृथ्वी ही आपली आई आहे आणि निसर्ग हे आपले जीवन आहे. होय, निसर्गाशिवाय मानवी जीवन शक्य नाही, परंतु तरीही आपण विकासाच्या आणि आधुनिकतेच्या शर्यतीत पर्यावरणाची हानी करत आहोत. आपण निसर्गापासून दूर जात आहोत. आता धबधबा, नदी, तलाव, जंगल पाहण्यासाठी दूरवर जावे लागते. आपल्याला वेळोवेळी पर्यावरणाची हानी होण्याचाही फटका बसत आहे. कधी पूर येतो तर कधी ढग फुटतात. (world environmentday 2022 date theme history significance why celebrate on 5 june)
कुठेतरी पृथ्वीवर पाण्याचा दुष्काळ पडत आहे तर कुठे जमीन आग ओकत आहे. हे सर्व केवळ हवामान बदलामुळे घडत आहे. झाडे तोडल्यामुळे हवा इतकी प्रदूषित झाली आहे की शहरांमध्ये श्वास घेणेही कठीण झाले आहे. शहरांचे जीवन पर्यावरण आणि निसर्गापासून कोसो दूर झाले आहे, येथे राहणा-या लोकांना असे आजार होत आहेत जे याआधी लोकांनी कधी ऐकले नाहीत किंवा पाहिले ही नाहीत. या सगळ्याचे कारण कुठेतरी आपली ढासळलेली जीवनशैली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जगभरात पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते. म्हणूनच दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा उद्देश
विकासाबरोबरच जगभरात पर्यावरणाचीही हानी होत आहे. जंगले नष्ट होत आहेत. नद्या-नाल्यांचे प्रवाह बदलले जात आहेत. त्यामुळे जगभरात प्रदूषणाची पातळी वाढत आहे. वाढते प्रदूषण आणि निसर्गाचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यासाठी पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवशी लोकांना पर्यावरणाबाबत जागरूक केले जाते. निसर्गाला प्रदूषित होण्यापासून वाचवा, असे आवाहन नागरिकांना केले जात आहे.
जागतिक पर्यावरण दिनाची थीम
दरवर्षी पर्यावरण दिनाची खास थीम असते. या वर्षी जागतिक पर्यावरण दिन 2022 ची थीम 'Only One Earth' आहे. म्हणजे 'निसर्गाशी एकरूप होऊन जगणे'.
जागतिक पर्यावरण दिनाचा इतिहास
पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन पहिल्यांदा 1972 साली संयुक्त राष्ट्र संघाने पर्यावरण दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून 5 जून हा पर्यावरण दिन जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने जरी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची घोषणा केली असली, तरी पहिल्यांदाच स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे 5 जून 1972 रोजी पर्यावरण परिषद झाली. या परिषदेत पर्यावरण वाचवण्याबाबत जनजागृती करण्यात आली. या परिषदेत 119 देश सहभागी झाले होते.