हे सत्य आलं समोर ; अशा पुरुषांकडे स्त्रिया होतात आकर्षित
नुकत्याच काही कालावधी पूर्वी एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. फिनलंडमधील संशोधकांनी १८ ते ४९ वयोगटातील एकूण १२ हजार ६५६ लोकांमध्ये हे सर्वेक्षण केले. अभ्यासात्मक दृष्टीने उद्देश हा होता की लोक कोणत्या वयात लैंगिक संबंधासाठी जोडीदाराला अधिक प्राधान्य देतात. संशोधकांनी याबद्दल काहींना विचारणा केली की ते कोणत्या वयोगटात आकर्षित झाले आहेत आणि गेल्या 12 वर्षांत त्यांनी कोणत्या वयोगटाशी अधिक संपर्क साधला आहे.
अहवालात असे म्हटले आहे की, सर्वेक्षणाचे निकाल पुरुष आणि महिलांसाठी भिन्न आहेत. बहुतेक स्त्रिया आपल्यापेक्षा वयोगटाने मोठ्या पुरुषांकडे अधिक आकर्षित होतात. ३० वर्षे वयापर्यंत पोहोचणाऱ्या स्त्रिया सामान्यत: स्वतःपेक्षा चार वर्षांनी त्याहून अधिक मोठ्या असलेल्या पुरुषांना प्राधान्य देतात आणि स्त्रियांच्या वाढत्या वयात हे अंतर कमी होत जाते.
'इव्होल्यूशन अँड ह्युमन बिहेविअर' या संशोधन जर्नलच्या ताज्या अंकात प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार सर्व पुरुष 20 ते 30 वयोगटातील महिलांकडे आकर्षित झाले होते. तरुण पुरुषही त्याच वयाच्या महिलांकडे आकर्षित होत असल्याचे दिसून आले. पुरुष मोठ्या वयात परिपक्व होतात. संशोधकांचा असा विश्वास आहे की स्त्रिया वृद्ध पुरुषांकडे आकर्षित होतात कारण वृद्ध पुरुषांकडे अधिक काही गोष्टी असतात. भरपूर पैशावाले आणि अनुभवी लोकांकडे काही स्त्रियांचा कल अधिक वाढतो. एका संशोधकाचे म्हणणे आहे की पुरुष महिलांपेक्षा जास्त वयात परिपक्व होतात. असेही मानले जाते की पुरुषांमध्ये सेक्ससाठी जोडीदाराचे आकर्षण स्त्रियांच्या प्रजननक्षमतेशी सुसंगत असते.