Anant Chaturthi 2023: अनंत चतुर्दशीच्या दिवशी परिजनांना द्या या शुभेच्छा
Ganapati Visarjan 2023: गणेश चतुर्थीच्या दिवसापासून सुरू होणाऱ्या या उत्सवाच्या दहाव्या दिवशी गणेश जीचे विसर्जन केले जाते. या दिवसाला अनंत चतुर्दशी असेही म्हणतात कारण हा चतुर्दशीचा दिवस आहे. या दिवशी गणेशाची मूर्ती समुद्र, नदी किंवा तलावामध्ये मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने विसर्जित केली जाते. या वर्षी अनंत चतुर्दशीचा दिवस 28 सप्टेंबरला आहे. गणपती विसर्जन या विशेष दिवशी सर्वांना शुभेच्छा पाठवा.
“बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना”
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना…
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!
बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…
डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!
दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..
पुन्हा येणार तु वर्षाने..!
!!गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या!!