भगरमधूनच का होते विषबाधा? जाणून घ्या भगर खाताना कोणती काळजी घ्याल

भगरमधूनच का होते विषबाधा? जाणून घ्या भगर खाताना कोणती काळजी घ्याल

सध्या भगर खाल्लाने विषबाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. बीड, औरंगाबाद या ठिकाणी भगर खाल्लाने अनेक जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उपवासात फराळ म्हणून भगर खाल्ली जाते. मात्र ही भगर खाल्लाने आपल्या जीवावर बेतू शकते. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या विषबाधेचे प्रमाण औरंगाबादमध्ये सर्वाधिक आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सध्या भगर खाल्लाने विषबाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. बीड, औरंगाबाद या ठिकाणी भगर खाल्लाने अनेक जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उपवासात फराळ म्हणून भगर खाल्ली जाते. मात्र ही भगर खाल्लाने आपल्या जीवावर बेतू शकते. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या विषबाधेचे प्रमाण औरंगाबादमध्ये सर्वाधिक आहे. भगरीचे पीठ दळून आणल्यानंतर ते तीन दिवसांच्या आत त्याची भाकरी करून खावी, पीठ साठवून ठेवूच नये. कारण पावसाळ्यात साठवून ठेवलेल्या पिठाला बुरशी येऊन त्यातून विषबाधा होत असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ही भगर खाल्लाने अनेकांना अंगाला थरथरी सुटू लागली. चक्कर येऊ लागली. अंग गळून गेल्यासारखे होऊ लागले. मळमळ होऊ लागली. अचानक उलट्या सुरु झाल्याचे समजते. भगरची पीठ हे फिरस्ती विक्रेत्यांकडून विकत घेण्यात येत असल्याचे अन्न व आरोग्य प्रशासनाने सांगितले. यासोबतच त्यांनी सांगितले आहे की, नागरिकांनी कोणतेही पदार्थ घेताना ते पॅकबंद असून परवानाधारक विक्रेत्यांकडून ते विकत घ्यावे असे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद ग्रामीणच्या वैजापूर पोलिसांनी ८ किराणा दुकानदारांच्या विरोधात कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.

भगरचे पीठ विकत घेताना कोणती काळजी घ्याल

भगर खरेदी करताना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्रमांक पॅकिंग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करू नये. सुटी भगर व खुले भगर पीठ विक्रीसाठी ठेऊ नये.

भगर खाताना काय काळजी घ्याल

भगर खरेदी केल्यानंतर ती घरी शिजवून खावी. जर भाकरी करायची असेल तर भगर घरीच दळावी. परंतु भगरीचे पीठ साठवून ठेवू नये अथवा सकाळी केलेली भगर रात्री खाऊ नये. व जर भगरीचे पीठ घरी दळले तर ते घरात व्यवस्थित झाकून ठेवले पाहीजे. कारण ते पीठ तीन दिवसांत खराब होते. दळलेल्या भगरीच्या पिठाला पावसाळ्याच्या बुरशी लागते यातून विषबाधा होते. यासोबतच भगरीचे मोकळे पीठ विकत मिळते. ते विकत घेऊ नये. घरी सकाळी तयार केलेली भगरीची भाकरी संध्याकाळी खाऊ नये, रात्रीची शिळी भगर खाऊ नये विषबाधा होण्याची दाट शक्यता असते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com