चेहऱ्यावर ग्लो हवाय? वापरा या 4 गोष्टी, चेहरा होईल डिटॉक्स
महागडे स्किन केअर प्रोडक्ट्स वापरल्यानंतरही त्वचेवर चमक येत नाही. चेहऱ्यावरील मुरुम, ब्लॅकहेड्स आणि डाग जात नाहीत. अशात तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची त्वचा डिटॉक्स करणे आवश्यक आहे. ज्यासाठी तुम्ही काही घरगुती फेस मास्क देखील वापरू शकता.
बाजारात अनेक प्रकारचे फेस मास्क उपलब्ध आहेत. पण हे फेस पॅक साधारणपणे केमिकलवर आधारित असतात. अशा परिस्थितीत तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक फेस मास्क बनवू शकता आणि वापरू शकता.
केळी फेस मास्क
यासाठी केळी चांगले मॅश करा आणि त्यात एक चमचा मध आणि दोन चमचे फ्रेश क्रीम मिसळून पेस्ट बनवा. नंतर चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटे राहू द्या, त्यानंतर चेहरा धुवा. यामुळे त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळते.
स्ट्रॉबेरी फेस मास्क
स्ट्रॉबेरी फेस मास्क बनवण्यासाठी दोन स्ट्रॉबेरी मॅश करा. मग त्यात एक चमचा दही. एक चमचा मध आणि दोन चमचे लिंबाचा रस मिसळा. यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. हे तुमच्या चेहऱ्याचे उघडे छिद्र साफ करते आणि त्वचा चमकदार बनवते.
टोमॅटो फेस मास्क
टोमॅटो मॅश करून त्याचा रस काढा. नंतर एका भांड्यात दोन चमचे टोमॅटोचा रस घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटे तसेच राहू द्या, त्यानंतर चेहरा धुवा. हे त्वचा डिटॉक्स करते आणि पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स सारख्या समस्यां दूर होतात.
द्राक्षांचा फेस पॅक
द्राक्षे मॅश करा आणि त्याचा रस काढा. त्यानंतर अर्धा कप द्राक्षाच्या रसात दोन-तीन चमचे मैदा मिसळून पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटे तशीच राहू द्या, त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याची त्वचा डिटॉक्स होते आणि डाग दूर होतात. यासोबतच या फेसपॅकमुळे त्वचा घट्ट होते.