पावसाळ्यात रेनकोट वापरता? 'हे' काही स्टायलिश रेनकोट तुम्ही वापरू शकता

पावसाळ्यात रेनकोट वापरता? 'हे' काही स्टायलिश रेनकोट तुम्ही वापरू शकता

अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला आता सुरुवात झाली आहे. तुम्ही कितीही फॅशनेबल लुक करून एखाद्या ठिकाणी गेलात तरी तुमची फॅशन ही कोणाला दिसून येत नाही. अशा वेळी महत्त्वपूर्ण ठरतो तो तुमचा रेनकोट, तुमचा रेनकोट दिसायला जितका स्टायलिश आणि अट्रॅक्टीव्ह असेल तितके तुम्ही कुल लुकसह चांगले दिसता.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला आता सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात अनेक जण निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ट्रेकिंग, डॅम, निसर्गरम्य पर्यटनस्थळे यासारख्या अनेक ठिकाणी पावसाळ्यात खुलून आलेले निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी जातात. अशा वेळी तुम्ही छत्री घेऊन पर्यटनस्थळी नाही जाऊ शकतं, यामुळे रेनकोटची गरज तुम्हाला पडते. तसेच तुम्ही कितीही चांगला आणि स्टायलिश लुक केला तरी अचानक येणाऱ्या पावसाच्या सरीमुळे तुमचा लुक रेनकोटमध्ये झाकून जातो.

यामुळे तुम्ही कितीही फॅशनेबल लुक करून एखाद्या ठिकाणी गेलात तरी तुमची फॅशन ही कोणाला दिसून येत नाही. अशा वेळी महत्त्वपूर्ण ठरतो तो तुमचा रेनकोट, तुमचा रेनकोट दिसायला जितका स्टायलिश आणि अट्रॅक्टीव्ह असेल तितके तुम्ही कुल लुकसह चांगले दिसता. पावसाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी काही ट्रेंडिंग रेनकोट आहेत जे पावसाळ्यात तुम्हाला फॅशनेबल लुक देतील.

ट्रेंच स्टाईल रेनकोट

हा रोनकोट तुम्ही ऑफिसला जाताना घालू शकता. हा रेनकोट तुम्हाला स्मार्ट आणि प्रोफेशनल स्टायलिश लुक देता. या रेनकोटमध्ये बॉसी लुकसह तुम्ही अट्रॅक्टीव्ह दिसाल.

रिवर्सिबल रेनकोट

हा रेनकोट निळ्या, काळ्या, पिवळ्या, लाल आणि हिरव्या रंगात मिळतो. हा रेनकोट वेगवेगळ्या प्रकारात मिळतो, महिलांसाठी यात जॅकेट आणि गाऊन प्रकार दिसून येतो तर पुरुषांसाठी यात जॅकेटसह पॅन्ट देखील उपलब्ध आहे. तसेच हा रेनकोट प्राण्यांसाठी ही उपलब्ध आहे.

स्पोर्ट अप रेनकोट

हा रेनकोट सुद्धा जॅकेट आणि पॅन्टसह मिळतो, तसेच हा रेनकोट प्लेन आणि ट्रांसपेरेंट असा मिळतो. जो दिसायला छान आणि गोंडस लुक देतो.

पोंचो स्टाइल रेनकोट

हा रेनकोट आकाराने मोठा असून तो या रोनकोटचे हात हे बटरफ्लाय स्टाइलचे असतात. तसेच हा रेनकोट लहान मुलं, महिला आणि प्राण्यांसाठी विशेष आहे. हा रेनकोट तुम्हाला क्यूट लुक देतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com