Vastu Tips : तुळशी सोबत 'ही' 3 चमत्कारी रोपे लावा घरी, मग पाहा चमत्कार
Vastu Tips : हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. तुळशीला देवासमान मानले जाते आणि तिची पूजा करण्याचे काही नियम आहेत. तुळशी ही भगवान विष्णूची लाडकी आहे. अशा स्थितीत भगवान विष्णूची पूजा करताना तुळशीची पूजा नक्कीच केली जाते. यासोबतच भगवान विष्णूला अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशीचाही समावेश आहे. (tulsi lucky plants vastu tips shami and banana plant)
तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. घरात तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मकता दूर होते. याशिवाय तुळशीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्मही आढळतात, जे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जातात.
वास्तूनुसार घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी फक्त तुळशीची रोपटी पुरेशी असते, पण त्यासोबत इतर काही रोपे लावल्यास फायदा दुप्पट होतो. त्यामुळे तुमच्या घरातही तुळशीचे रोप असेल तर त्यासोबत हे रोपे नक्कीच लावा.
शमी वनस्पती - वास्तूनुसार शमीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. शमीची वनस्पती शनिदेवाशी संबंधित आहे. शनिवारी शमीच्या रोपाची पूजा केल्याने शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळतो.
काळा धोतरा - भगवान शिवाला धोतरा अर्पण केला जातो. असे मानले जाते की काळ्या धोतरा वनस्पतीमध्ये शिवाचे वास्तव्य आहे. अशा परिस्थितीत घरामध्ये ही रोपे लावणे खूप शुभ मानले जाते. तुळशीसोबत काळ्या धोतर्याचे रोप लावल्याने भगवान शंकराची विशेष कृपा होते. तुम्ही मंगळवारी काळ्या धोतर्याचे रोप लावू शकता.
केळीचे झाड - घरामध्ये केळीचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, तसेच घरात सुख-समृद्धी येते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. तुळशीच्या रोपाजवळ केळीचे रोप लावल्याने घरात खूप आशीर्वाद मिळतात. लक्षात ठेवा ही दोन झाडे एकत्र लावायची नसून केळीचे रोप घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आणि तुळशीचे रोप मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला लावायचे आहे.