Home remedies for Skin: थंडीमध्ये त्वचा कोरडी पडत असेल तर "हे" घरगुती उपाय करा
थंडी सुरू झाली की ओठ फाटणे, त्वचा कोरडी होणे अशा त्वचेसंबंधी अनेक समस्या वाढतात. थंड वाऱ्यात ओलावा कमी असल्याने त्वचा कोरडी पडायला लागते. अशावेळी तुम्ही घरगुती उपायांनी तुमची त्वचा मुलायम करू शकता.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार थंडीच्या दिवसात ज्यूसचे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी ज्यूर प्यायला जमत नसेन तर तुम्ही दुपारी ज्यूसचं सेवन करू शकता जेणेकरून चेहऱ्यावरील त्वचेच ओलावा राहतो.
मोहरीचे तेलदेखील त्वचेसाठी फायदेशीर ठरते. मोहरीचे तेल आर्द्रता टिकवून ठेवते. रिझवाना ब्युटी अँड मेकअप आर्टिस्टने सांगितले की, आजच्या धावपळीच्या जीवनात लोक स्वतःची काळजी घेऊ शकत नसल्याने थंड वाऱ्यामुळे चेहरा आणि त्वचेची आर्द्रता कमी व्हायला लागते. यामुळे चेहरा कोरडा आणि निर्जीव दिसू लागतो. तसेच आपले ओठ अधिक कोरडे होतात. अशा परिस्थितीत तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर करून त्वचेमधील तजेलदारपणा आणि ओलावा टिकवून ठेवू शकता.
चेहऱ्यावर झटपट चमक येण्यासाठी तुम्ही मसूरचादेखील वापर करू शकता. दोन चमचे मसूर आणि एक वाटी कच्चे किंवा उकळलेले दूध मिक्स करून चार ते पाच तास तसंच राहू द्यावं. यानंतर ते बारीक करून चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटांनी हलक्या हाताने काढून टाका. असे केल्याने चेहऱ्यावरील ओलावा टिकून राहतो आणि चमकही वाढते.
दुधाची साय देखील थंडीच्या दिवसात चेहऱ्यासाठी चांगली असते. सायीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. साय चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने चेहरा मॉइश्चराईज राहतो. हे सर्व घरगुती उपाय संध्याकाळी केले तर ते अधिक प्रभावी ठरतात कारण दिवसा हे उपाय केल्यास धूळ आणि सूर्यप्रकाशामुळे सकारात्मक परिणामांऐवजी प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.