लाईफ स्टाइल
पावसाळ्यात गाडीने प्रवास करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा
पावसाळ्यात आरोग्यासह गाडी चालवतांना देखील काळजी घेणे गरजेचे असते.
पावसाळ्यात आरोग्यासह गाडी चालवतांना देखील काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात गाडी चालवताना ओला रस्ता यामुळे अनेक अडचणी येतात. तुमच्या गाडीच्या समोरची काच जर वायपर वापरून देखील स्वच्छ होत नसेल, तर अशा वेळी अपघाताचा धोका वाढतो.
पावसात गाडी चालवताना जर तुमचे ब्रेक आवाज करत असतील, किंवा ब्रेक पॅडल अधिक टाईट किंवा लूज असेल तर लवकरच नीट करुन घ्या. गाडीचे टायर तपासून घेणं गरजेचं आहे. बॅटरीला असलेल्या वायर लूज होण्याचाही धोका असतो. त्यामुळे, पावसात गाडी बाहेर काढण्यापूर्वी बॅटरी तपासून घ्यावी.
पावसाच्या पाण्यामुळे विंडस्क्रीनवर धुकं पडत आणि बाहेरचं दृश्य स्पष्टपणे दिसत नाही. ही समस्या टाळण्यासाठी एसी चालू ठेवावा. पावसाळ्यात गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. गाडी चालवताना आपल्याला लांबच्या गोष्टी दिसत नाहीत, अशा वेळी हेडलाईट्सचा वापर करावा.