देशात फोफावतोय टोमॅटो फिव्हर, 'या' व्यक्तींना होऊ शकते लागण
मागील दोन वर्ष जगासह देशाने कोरोना महामारीचा सामना केला. मात्र आता कुठे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत आहे. कोरोनानंतर अनेक नवनवीन विषाणू उद्भवलेले निदर्शनात आले. म्युकर मायकॉसीसने, मंकीपॉक्सची अशा गंभीर विषाणूने जगभरातील आरोग्य यंत्रणेची झोप उडवली. हे सर्व होत नाही तर आता टोमॅटो फिव्हरचा धोका निर्माण झाला आहे. हँड फूट माउथ डिसीजज्याला टोमॅटो फिव्हर असेही म्हणतात, हा आरोग्य तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कारण तो लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरतो हे विशेष. लॅन्सेट रेस्पिरेटरी जर्नलमधील अभ्यासानुसार, केरळमध्ये 6 मे 2022 रोजी टोमॅटो फ्लूचा पहिला रुग्ण आढळला होता आणि आतापर्यंत 82 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हा ताप एक ते पाच वर्षे वयोगटातील मुले आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या प्रौढांना उद्भवतो.
काय आहे टोमॅटो फ्लू ?
इंडिया टूडेच्या मते, लॅन्सेट अभ्यासात असे म्हटले आहे. की, टोमॅटो फ्लूची लक्षणे कोरोनाची लक्षने सारखीच आहेत. परंतु हा विषाणू SARS-CoV-2 शी संबंधित नाही, तो पूर्णपणे वेगळा आहे. चिकुनगुनिया किंवा डेंग्यू तापानंतर मुलांमध्ये टोमॅटो-फ्लू होऊ शकतो. या फ्लूचे नाव टोमॅटो-फ्लू आहे कारण यामुळे संपूर्ण शरीरावर लाल आणि वेदनादायक फोड येतात.
फ्लूचा कोणाला धोका ?
लहान मुलांना टोमॅटो फ्लूचा धोका अधिक असतो कारण विषाणूजन्य संसर्ग या वयात मुलांपेक्षा जास्त होतो, असे लॅन्सेट अहवालात म्हटले आहे. पाच वर्षांखालील मुलांना या अवस्थेचा सर्वाधिक फटका बसत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. टोमॅटो फ्लू संसर्गजन्य आहे.
काय आहेत लक्षणे?
लक्षणांमध्ये उच्च ताप, पुरळ, सूजलेले सांधे, मळमळ, अतिसार, डिहायड्रेशन,तीव्र सांधेदुखी यांचा समावेश होतो. शरीर दुखणे, ताप आणि थकवा ही इतर लक्षणे कोरोना रुग्णांना सुध्दा उध्दभवली आहेत. रुग्णांच्या त्वचेवर फोडांचा आकार लक्षणीय वाढला होता.
काय आहे टोमॅटो फ्लूचा उपचार
टोमॅटो फ्लूपासून दूर राहण्यासाठी डॉक्टर स्वच्छ राहण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांशी संपर्क साधा. लहान मुले किंवा ज्या लोकांना संसर्ग झाला आहे त्यांनी फोड फोडणे आणि खाजवणे टाळावे. जास्त पाणी प्या.