कपाळावर असणाऱ्या बेबी हेअर्सचा कंटाळा आलाय? मग अशी करा हेअरस्टाइल
लांबसडक केस हे प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य मानले जाते. पण कपाळावर असणाऱ्या बेबी हेअर्समुळे आपल्या हेअरस्टाइलचा लूक बिघडतो. या बेबी हेअर्समुळे आपली हेअरस्टाईल विस्कटलेली दिसते. काही बेबी हेअर्स इतके लहान असतात की ते कानाच्या मागे देखील जात नाहीत. त्यामुळे कितीही छान हेअरस्टाइल केली तरी बेबी हेअर्समुळे पुर्ण लूक बिघडतो. आपण कधी तरी हे बेबी हेअर्स कापण्याचा विचार करतो. पण हे छोटे बेबी हेअर्स कापण्याऐवजी त्यांनादेखील आपल्या हेअरस्टाइलचा भाग करून घेतला जाऊ शकतो. यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय काही हटके टिप्स. 'या' काही टिप्स नक्की फॉलो करा.
साइड स्वीप करून आकर्षक असा लूक करा:
कपाळावर येणाऱ्या बेबी हेअर्सला साइड स्वीप करणं एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला हव्या त्या बाजूने केस साइड स्वीप करा. यामुळे तुमचे बेबी हेअर्स दिसून येणार नाही. बेबी हेअर्सला हेअरस्टाइलिंग जेल लावून मोठ्या केसांमध्ये बेबी हेअरला लपवन सोप जाऊ शकतं.
कर्ल करा:
कर्ल मशीनने केस कुरळे केल्याने तुमचा लूक आकर्षक आणि मोहक दिसेल. बेबी हेअर्सला कर्ल केल्यामुळे तुमची हेअरस्टाइल तुम्हला वेगळा लूक देईल. तसेच कुरळ्या केसांमध्ये हेअरस्टाईल आणि तुम्ही अधिकच उठून दिसाल.
मेस्सी बन हेअरस्टाईल करा:
मेस्सी बन हेअरस्टाइल केल्यामुळे बेबी हेअर्समुळे दिसून येणारी विस्कटलेली हेअरस्टाईल विस्कटल्यासारखी वाटणार नाही. ही हेअरस्टाइल लग्नसोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात केली जाते. ज्यामुळे केस विसकटलेले वाटत नाही आणि सुंदर असा लूक दिसू लागतो.