watermelon
watermelon Team Lokshahi

कलिंगड खल्लाणे होतात हे फायदे; ; चला जाणून घेऊ या

Published by :
Team Lokshahi
Published on

उन्हाळामध्ये आपल्याला जास्त तहान लागते. म्हणून आपण थंड पाणी पितो. तसेच उन्हाळ्यामध्ये जास्त खाल्ले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. कलिंगडमध्ये (watermelon ) 90 टक्के पाणी असते. ते आपल्या शरीराला हायड्रेटेड आणि ताजे ठेवण्यास मदत होते. कलिंगड हे जेवढे खायला चवदार असते. तेवढेच त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि त्यामध्ये पोषक तत्वाचे घटक असतात. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए यांचा समावेश आहे.

कलिगड (watermelon)खल्लाने शरीराला थंडावा मिळतो. याचे महत्वाचे कारण हे एसीसारखे त्वचेला गार करणार नसून हे रक्तालाही थंड करतो. उन्हाळ्यामध्ये होणारी गरमी, लघवीचा त्रास, अंगावर उठणाऱ्या उष्णतेमुळे पुटकुळ्या अशा प्रकारच्या समस्येवर कलिंगडचा रस (Juice) हा उपयुक्त आहे.

कलिंगड खाण्याचे हे आहेत फायदे

  • कलिंगडमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम (Potassium and magnesium) यांचे प्रमाण शरीरामधील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्यामध्ये लाइकोपीन सारख्या अँटीऑक्सिडंट्स असल्याने ते ह्रदयाचे संरक्षण करण्यास मदत करते.

  • कलिंगडामध्ये कॅरोडीनाईट असल्याने ह्रहयविकाराचा झटक्याचा धोकाही कमी करण्यास मदत होते.

  • कलिंगड हे फळ रसाळ आणि चवीलाही गोड आहे. त्यामध्ये कमी कॅलरी (Calories) असल्याने ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, त्याचा वापर आपण आहारात केला पाहिजे. जे आपल्याला निरोगी ठेऊन आपले वाढते वजन कमी करण्यास मदत होते.

  • कलिंगडमध्ये 90 टक्के पाणी असल्याने ते शरीराला हायड्रेटेक (Hydratech) ठेवते. कलिंगड हे शरीराला थंड ठेवते.

  • ज्यांना मूत्रपिंडातील स्टोनचा त्रास आहे. त्यांनी कलिंगडचे सेवन केले पाहिजे. कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. ज्यामुळे मूत्रपिंडालाही डीटॉक्स ठेवते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com