Spiny Gourd Benefits : कंटोला आहे आरोग्यासाठी फायदेशीर
पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाजारामध्ये अनेक रानभाज्या येत असतात. त्यामधील हंगामी फळभाज्यांमधील एक भाजी म्हणजे कंटोला (Spiny Gourd). त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. या भाजीला काहीजण कंटोळी म्हणतात तर काही याला कंटोला असेही म्हणतात. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व आणि व्हिटॅमिन आढळतात. कंटोला ही भाजी जरी दिसायला कारल्याप्रमाणे दिसत असली तरी ही भाजी चवीला कडू लागत नाही. कंटोलामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) डी, बी 12, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यांसारख्या पोषक तत्वांचा यामध्ये समावेश असतो. त्यामुळे या भाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश केल्याने त्याचा आपल्याला फायदाचं होईल. तर चला जाणून घेऊया कंटोलाचे काय आहेत फायदे.
कंटोला खाण्याचे फायदे :
कंटोला भाजीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसेच सर्दी, खोकला या समस्यासाठी फायदेशीर ठरते. कंटोला खाल्ल्याने कावीळ सारखे आजारही दूर होतात. ताप असला तरीही तुम्ही कंटोला खाऊ शकता.
कंटोला खाल्ल्याने डोकेदुखी, केस गळणे, कान दुखणे, खोकला, पोटात दुखणे यासारख्या समस्या जाणवत नाही.
कंटोला भाजीचे सेवन केल्याने ते मधुमेहावरही खूप फायदा होतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
ब्लडप्रेशर आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यातही मदत होते.
पचनक्रिया सुधारण्यातही कंटोला चांगली भूमिका बजावते. कंटोला हे आयुर्वेदात औषध मानलं जातं, ज्याचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो.
त्वचेला निरोगी ठेवण्यासाठीही कंटोला खूप फायदेशीर ठरते. कंटोलामध्ये बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारख्या विविध फ्लेव्होनॉइड्स असतात. ते त्वचेसाठी वापरल्याने त्वचेवर चमक येते.