Eye Care Tips : डोळ्यांना काजळ लावण्याचे फायदे; जाणून घ्या सविस्तर...
आजवर तुम्ही काजळ लावण्याचे नुकसान ऐकले असाल. परंतु याचे फायदे आम्ही आपणास सांगणार आहोत. काजळ ही जादूच्या कांडीपेक्षा कमी नाही. कारण ती डोळ्यांना लावताच डोळ्यांच्या सौंदर्याला बहर यायला लागते. उलट त्याचा फक्त एक झटका तुमच्या संपूर्ण सौंदर्याला बदलू शकतो. डोळे हा प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. त्यामुळे त्यांना हायलाइट करण्यात काही गैर नाही. यामुळेच मेकअप न आवडणाऱ्या लोकांनाही काजळ आवडते. तसे काजळ देखील मेकअपचं सौंदर्य वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावतं. म्हणून तुम्ही ते आकर्षक बनवण्यासाठी तुमच्या डोळ्याच्या इतर मेकअप लूकसह एकत्र करू शकता. पण तुम्हाला माहित आहे का की काजळचा वापर आपण आयशॅडो (Eyeshadow) प्राइमरसारखं अनेक प्रकारे करू शकतो. आम्ही तीन सर्वोत्तम काजळ तुम्हाला सांगणार आहोत जे प्रत्येक मेकअप प्रेमीला माहित असले पाहिजेत.
आयुर्वेदिक काजळ बनवण्यासाठी पितळ आणि चांदीचा वापर केला जातो. हे गुणधर्म डोळ्यांच्या समस्यांपासून आराम देतात. यासोबतच डोळ्यांना होणाऱ्या ऍलर्जीपासूनही (Allergy) सुटका मिळते. डोळ्यांना वारंवार चोळल्याने रक्तवाहिन्यांना सूज येते, अशा स्थितीत काजल लावल्याने सूज कमी होते आणि डोळ्यांचे कार्य सुधारते.
आयुर्वेदिक काजलमध्येही देसी तूप वापरले जाते. तुपामुळे डोळ्यांचा थकवा आणि तणाव कमी होतो आणि त्यामुळे तुम्हाला डार्क सर्कलची समस्या येत नाही. हे डोळ्यांच्या वरच्या आणि खालच्या अशुद्धी साफ करण्यास देखील मदत करते. अशाप्रकारे आयुर्वेदिक काजळ तुमचे डोळे इन्फेक्शनपासून (Infection) स्वच्छ करते आणि डोळे (Eye) स्वच्छ ठेवते.