चांगली झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचे करा सेवन
जेव्हा तुम्ही काही खाता तेव्हा कोणते आहार घेत आहात हे महत्त्वाचे असते. पोषणतज्ञ कनिका मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार, “रात्रीचे जेवण केल्यानंतर, जेव्हा तुम्ही झोपायला जाता, तेव्हा त्यामध्ये किमान दोन ते तीन तासांचे अंतर असणे आवश्यक आहे.”
बदाम(Almond) झोपेची गुणवत्ता वाढवण्यासही मदत करतात. कारण बदाम हे मेलाटोनिन हार्मोनचा स्रोत आहे. मेलाटोनिन तुमच्या झोपेचे नियमन करते आणि तुमच्या शरीराला चांगल्या झोपेसाठी तयार होण्याचे संकेत देते.
झोपताना एका ग्लास दुधात उकळून त्यात मखाना (Makhana)टाकून खाल्ल्याने झोपेची पद्धत सुधारते आणि झोपेचे विकारही दूर होतात. त्यात तंत्रिका-उत्तेजक गुणधर्म आहेत जे तणाव आणि चिंता कमी करून झोपेला प्रवृत्त करतात.
कॅमोमाइल चहा (Chamomile tea) प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, चिंता आणि नैराश्य कमी होते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. याव्यतिरिक्त, कॅमोमाइल चहामध्ये काही अत्यंत चांगले गुणधर्म आहेत जे झोपेची गुणवत्ता सुधारू शकतात.
डार्क चॉकलेट (Dark Chocolate)हा झोपेसाठी सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. डार्क चॉकलेटमध्ये सेरोटोनिन देखील असते, जे तुमचे मन आणि मज्जासंस्थेला शांत करते आणि तुम्हाला शांत झोपायला मदत करते.