तुम्हीही लावता रोज लिपस्टीक? तर त्याआधी 'हे' वाचाच
Skin Care : लिपस्टिकशिवाय मेकअप अपूर्ण मानला जातो. लिपस्टिक वेगवेगळ्या रंगांच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांनी बनवलेल्या असतात. आजकाल अनेक ब्रँड्स हर्बल लिपस्टिक देखील बनवतात. पण, लिपस्टिकचा रंग आणि ब्रँड काहीही असो लिपस्टिकचे अनेक साइड इफेक्ट्स देखील असू शकतात, त्यामुळे ती रोज लावणे टाळण्यास सांगितले जाते.
रोज लिपस्टिक लावल्याने होणारे दुष्परिणाम
पिग्मेंटेशन
रोज लिपस्टिक लावल्याने ओठांचे पिग्मेंटेशन होऊ शकते. कोणतेही लिप बाम किंवा यूव्ही प्रोटेक्शन प्रोडक्ट न लावता रोज फक्त लिपस्टिक वापरल्याने ओठांचा नैसर्गिक रंग बदलू शकतो.
फाटलेले ओठ
लिपस्टिक मॅट, क्रिमी मॅट किंवा द्रव असू शकते. परंतु, ते ओठांना नैसर्गिक ओलावा देत नाही उलट त्यांना कोरडे बनवते. अशा स्थितीत रोज लिपस्टिक लावावी लागत असली तरी ओठांच्या निगाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
आरोग्यासाठी हानीकारक
ओठांवर लिपस्टिक लावली जात असताना जीभेलाही स्पर्श होतो. हे स्पष्ट आहे की लिपस्टिक थेट तोंडातून पोटात जाते. त्यामुळे लिपस्टिकमधील रसायनेही पोटात जाऊन आरोग्यास हानी पोहोचवतात. यामुळे शरीराच्या अंतर्गत अवयवांना संसर्ग आणि नुकसान देखील होऊ शकते.
त्वचा अॅलर्जी
जर लिपस्टिकमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त रसायने असतील तर ते केवळ ओठांसाठीच नाही तर आजूबाजूच्या त्वचेसाठीही हानिकारक आहे. रासायनिक लिपस्टिकमुळे ओठांवर खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते आणि ओठांच्या आसपासच्या त्वचेवर देखील परिणाम होतो.